मावळ ऑनलाईन —तळेगाव दाभाडे येथील यशवंत नगरमध्ये (Talegaon Dabhade)राहणाऱ्या सुनंदा बाळकृष्ण माहुलकर या ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सुनिल शेळके, पोलीस आयुक्त विनायक चौबे, सहकार आयुक्त, तसेच तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे एक भावनिक, व्यथित निवेदन सादर करत आपल्या कुटुंबावर होणाऱ्या सततच्या त्रासाविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “आम्हाला दिला जाणारा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ इतका वाढला आहे की आता आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.”
माहुलकर यांनी आपल्या अर्जात सांगितले की, त्यांच्या प्लॉट क्रमांक ४०९ संदर्भात नारायण सोळंकी आणि इतर व्यक्तींनी फसवणूक केली असून, पूर्वी न्यायालयात झालेल्या तडजोडीनुसार त्यांना मिळकतीतून पीठ गिरणी व घरात जाण्याचा हक्क असताना त्या अटींना डावलून कन्व्हिनिअन्स डीड करण्यात आले. तसेच त्यांनी नारायण सोळंकी यांना ५० लाख रुपयांची रक्कम दिली असूनही व्यवहार पूर्ण न करता उलट त्यांच्यावर मानसिक दडपण आणले जात आहे. यामुळे त्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
माहुलकर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कुटुंबावर सोसायटीतील इतर काही फ्लॅटधारक अपर्णा कुलकर्णी, सुनिता डोईफोडे, मधुकर काशीद, धनंजय कुलकर्णी, सायस्ता शेख आदी सतत त्रास देत असून, त्यांच्या मुलांवर आणि सुनांवर जातीय शिवीगाळ, मारहाण, अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. त्यांच्या धाकट्या सुनेला जातीवाचक शब्द वापरून मारहाण करण्याचा प्रयत्न झाला असून, लहान नातवंडांवर देखील टोमणे मारून मानसिक त्रास दिला जात आहे.
Sharad Pawar : पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवारांची सत्ता येणार
माहुलकर कुटुंबाचा हॉटेल व्यवसाय असून, तो बंद पाडण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या खासगी मालमत्तेमधील झाडे कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय तोडण्यात आली असून, याबाबत तक्रारी करूनही संबंधित आरोपी हजर होत नाहीत. त्यांच्याविरुद्ध पूर्वी पोलिसात अर्ज देऊनही आजतागायत कोणतीही कारवाई झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
Karjat News : कडाव प्रवासी बस थांबा अनधिकृत बांधकाम प्रकरण
“आमच्यावर एवढा मानसिक व आर्थिक ताण आला आहे की, मी आणि माझे कुटुंब या त्रासाला कंटाळलो आहोत. माझी दोन्ही मुले, सुना, नातवंडे यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. आता न्याय मिळत नसेल तर आत्महत्येशिवाय आमच्यासमोर दुसरा मार्ग नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या आहेत.