मावळ ऑनलाईन — संततधार पावसामुळे पवना धरणातील (Pavana Dam)जलसाठा 83.16 टक्क्यांवर पोहोचले आहे.गुरुवारी सायंकाळी धरणार 81 टक्के पाणीसाठा होतात मावळ परिसरात रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे 15 तासात पाणीसाठ्यात 2 टक्के वाढ झाली आहे.
धरणामध्ये मोठ्या प्रमाणात येवा होत असल्याने आज (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता पवना नदीपात्रात 1400 क्युसेक्स विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
Karjat News : कडाव प्रवासी बस थांबा अनधिकृत बांधकाम प्रकरण
खडकवासला पाटबंधारे(Pavana Dam) विभागाने सूचना जारी करत पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. येत्या काही तासांत विसर्गाचे प्रमाण वाढविण्याची किंवा कमी करण्याची शक्यता असून, त्यावर पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर व धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा परिणाम होणार आहे.
धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर पवना नदी पात्रातील पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नदीपात्रात कोणत्याही नागरिकांनी उतरणे टाळावे, तसेच नदीकाठावरील शेती अवजारे, पाणीपंप, जनावरे आणि तत्सम साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे, असेही पूरनियंत्रण कक्षाने स्पष्ट केले आहे.
Sharad Pawar : पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवारांची सत्ता येणार
स्थानिक प्रशासनाला सूचित करण्यात आले असून, सखल भागातील नागरिकांना त्वरीत सतर्क करण्यात येत आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून स्थानिक प्रशासनाने दक्षता घ्यावी व नागरिकांनी जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले (Pavana Dam)आहे.