situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Karjat News : कडाव प्रवासी बस थांबा अनधिकृत बांधकाम प्रकरण

Published On:
Karjat New

पत्रकारांच्या ऐतिहासिक बेमुदत उपोषणाला यश

दोन दिवसात संपुर्ण अनधिकृत बांधकाम हटविण्याचे प्रशासनाने दिले आश्वासन

Team My pune city – कडाव गावातील ( Karjat News) शासकीय एसटी प्रवासी बस थांब्यावर झालेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात कर्जत प्रेस असोसिएशन, कर्जत प्रेस क्लब व रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने दिनांक २४ जुलै २०२५ पासून पुकारण्यात आलेल्या ऐतिहासिक बेमुदत उपोषणाला अखेर यश मिळाले आहे. प्रशासनाने दोन दिवसात म्हणजेच दि. २६ जुलै २०२५ पर्यंत सदर अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात निष्कासित करण्याचे स्पष्ट लेखी आश्वासन दिले आहे.


मागील दहा वर्षांपासून कडाव गावातील एसटी बस थांब्यावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास येत होते. अनेक वेळा पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित अनधिकृत बांधकामाबाबत लेखी तक्रारी व निवेदने सादर केली होती. शासकीय कागदपत्रांची पूर्तता, जागेची छाननी आणि पाहणी यानंतरही संबंधित बांधकामावर कोणतीही कारवाई होत नव्हती. त्यामुळे अखेर पत्रकारांनी थेट कृतीचा ( Karjat News) निर्णय घेत बेमुदत उपोषण पुकारले.

Dhanore Murder : डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून खून, आळंदी पोलिसांनी घेतले दोन आरोपींना ताब्यात


दि. २४ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता कडाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात पत्रकारांनी बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणाच्या चौथ्या तासानंतर ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे, सरपंच सौ. करुणा प्रमोद पवार, कर्जत एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक दयानंद मोरे, महादेव पालवे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे, हर्षद (सोनु) भोपतराव व कर्जत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या उपस्थितीत संवाद झाला. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने दिनांक २६ जुलै रोजी पोलीस बंदोबस्तात सदर अनधिकृत बांधकाम हटविण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात ( Karjat News)आले.


या आश्वासनानंतर पत्रकारांनी तात्पुरते उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रशासनाने जर २६ जुलैपर्यंत कारवाई केली नाही, तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही पत्रकारांनी दिला.

Santosh Dabhade: भावी नगराध्यक्ष म्हणून संतोष दाभाडे यांच्या नावाला आमचा पूर्ण पाठिंबा – आमदार सुनील शेळके


या बेमुदत उपोषणात पुढील पत्रकार उपस्थित होते: ( Karjat News)
प्रभाकर गंगावणे, भुषण प्रधान, कैलास म्हामले, नरेश जाधव, रमाकांत जाधव, रोशन दगडे, प्रथमेश कुडेकर, जगदीश दगडे, दिगंबर चंदने, दिपक बोराडे, गणेश लोट, रामदास माळी, मोतीराम पादीर, संदेश साळुंखे, सतिश पाटील, महेश भगत, आनंद सकपाळ, गणेश पवार, रजनीकांत पवाळी.
तसेच, कर्जत प्रेस असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार ॲड. कैलास मोरे यांनीही उपोषणात सहभाग घेतला. यावेळी भाजपाचे नेते राजेश लाड, दिपक बेहरे, प्रशांत उगले, अतुल बडगुजर, शैलेश देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पत्रकारांचे मनोबल वाढविले.


पत्रकारांच्या बेमुदत उपोषणास्थळी कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी याकरिता पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे, पोलिस अंमलदार अनिल वडते, राजेंद्र दुसाने उपस्थित होते. पत्रकारांच्या एकजुटीच्या आणि सत्यासाठीच्या लढ्यामुळेच प्रशासनाला नमते घेऊन निर्णय घ्यावा लागला, हे या ऐतिहासिक उपोषणाने अधोरेखित केले ( Karjat News) आहे.

Follow Us On