यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त करण्याचे वडगाव मावळ पोलिसांचे आवाहन
मावळ ऑनलाईन – गणेशोत्सव काळातील डीजेचा वापर आरोग्यास ( DJ ban) हानीकारक ठरत असेल तर इतरवेळी – होणाऱ्या मिरवणुकीतही तो हानिकारकच ठरतो. त्यामुळे आरोग्यास हानिकारक असलेल्या डीजे बंदीचा आदेश गणेशोत्सवापुरता मर्यादित नसून तो सगळ्याच प्रकारच्या सार्वजनिक मिरवणुकांना लागू असेल, अशा थेट सूचना वडगाव मावळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी गणेशोत्सव मंडळांना दिल्या.
Pavana Dam : पवना धरणात 81 टक्के पाणी साठा, विसर्गाची शक्य
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २३) झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोटोबा देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, विश्वस्त भास्करराव म्हाळसकर, सुभाषराव जाधव, तुकाराम ढोरे, अनंता कुडे, सुनिता कुडे, गुलाबराव म्हाळसकर, मंगेशकाका ढोरे,संभाजी म्हाळसकर,विशाल वहीले,अतुल राऊत,उमेश ढोरे,कल्पेश भोंडवे, सोमनाथ धोंगडे,सुदेश गिरमे, बाळासाहेब वाघमारे,सतीश गाडे, संजय दंडेल आदींसह गणेशोत्सव मंडळाचे ( DJ ban) प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक कुमार कदम म्हणाले, की गणेशोत्सव मंडळांनी इतर खर्च टाळून गावात काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत,त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. पोटोबा देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे यांनी डीजे बंदी घालण्यात येणाऱ्या निर्णयावर पोटोबा देवस्थान, जय बजरंग तालीम मंडळ व आमच्यासोबत असणारे मंडळ या निर्णयाचे पालन करतील, असे आश्वासन( DJ ban) दिले.
भास्करराव म्हाळसकर यांनी डीजे बंदी झालेल्या निर्णयानुसार सर्व मंडळांनी याचे पालन करणे आवश्यक आहे असे आवाहन केले आहे. मंगेशराव ढोरे यांनी शहरात जर डीजे बंदी घालण्यात आली नाही तर मी स्वतः उपोषणाला बसेल असा इशारा दिला. याशिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ( DJ ban) घ्यावयाच्या इतर दक्षता व पूर्वतयारी याबाबत उपस्थितांनी अनेक सूचना मांडल्या.
गतवर्षी झालेल्या विसर्जन मिरवणुकीत बहुतांश मंडळांनी डीजेचा वापर केल्याने मिरवणुकीत डीजेचा दणदणाट झाला होता. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे यापूर्वी शहरात केलेल्या वरात बंदी, गुलाल बंदी प्रमाणे यावर्षी डीजे नकोच अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती. त्यानुसार या बैठकीतही नागरिकांनी डीजे नको अशी भूमिका ( DJ ban) मांडली.





















