मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – आषाढ – कृष्णपक्ष. तिथी – १५. शके १९४७. वार – गुरुवार. तारीख – २४.०७.२०२५. (Rashi Bhavishya 24 July 2025) शुभाशुभ विचार – वर्ज्य दिवस. आज विशेष – दर्श अमावस्या, दीपपूजन, गुरुपुष्यामृत ( १६.४४ ते सूर्योदयापर्यंत) राहू काळ – दुपारी ०१.३० ते ३.००. दिशा शूल – दक्षिणेस असेल. आज नक्षत्र – पुनर्वसु १६.४४ पर्यंत नंतर पुष्य. चंद्र राशी – मिथुन १०.५९ पर्यंत नंतर कर्क.
—————————-
मेष- (शुभ रंग- डाळिंबी) Rashi Bhavishya 24 July 2025
बरेच दिवसापासून पेंडिंग असलेल्या काही घरगुती कामांकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. आज गृहिणींना थोडं मुलांच्या अभ्यासाकडे ही लक्ष द्यावे लागणार आहे.
वृषभ (शुभ रंग- पिस्ता)
सामाजिक कार्यकर्त्यांचा समाजातील मानसन्मान वाढेल. काही घरगुती कामे आज शेजाऱ्यांच्या मदतीने होतील. वाहन दुरुस्तीसाठी खर्च होईल.
मिथुन (शुभ रंग – सोनेरी)
खर्च जरी प्रमाणाबाहेर वाढला असला तरी आर्थिक चडचण भासणार नाही. राशीच्या द्वितीयातील चंद्र विविध मार्गाने धन देईल. शेजारी आज रुसून बसतील.
कर्क ( शुभ रंग- राखाडी)
आज तुम्ही लहरीपणाने वागाल. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. वयाने मोठ्या असलेल्यांचा मान राखा. इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या.
Talegaon Dabhade Crime News : गुटखा विक्री करणाऱ्यास अटक
सिंह ( शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 24 July 2025
विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. पासपोर्ट विजा संबंधित कामे विना व्यत्यय पार पडतील. वृद्धांनी आज अति दगदग टाळलेली बरी.
कन्या (शुभ रंग- जांभळा)
राशीच्या लाभातील चंद्र काही अनपेक्षित लाभ देणार आहे. पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक लाभदायी ठरेल. आज तुम्ही सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील.
तूळ (शुभ रंग- गुलाबी)
राशीच्या कर्म स्थानात चंद्रभ्रमण चालू असताना रिकामटेकड्या गप्पांत अजिबात वेळ घालून चालत नाही. वेळेचा सदुपयोग करूनच कार्यक्षेत्रात ध्येय गाठता येईल.
वृश्चिक ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
अति आक्रमकतेने नुकसान होईल. स्पर्धकांना कमजोर समजू नका. आज प्रामाणिक मेहनतीस दैवाची साथ नक्की मिळेल. आज यथाशक्ती दानधर्म कराल.
Pimpri-Chinchwad: श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराजांची पारंपरिक द्वारयात्रा २५ जुलैपासून सुरू
धनु (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 24 July 2025
नवीन व्यावसायिकांनी झटपट लाभाचा मोह टाळावा. आज गैरवर्तनाने मानहानी होईल. वैवाहिक जीवनातील असलेले सौम्य मतभेद फार ताणू नका.
मकर (शुभ रंग- सोनेरी)
आज कार्यक्षेत्रात उत्तम संधी चालून येणार आहेत. सकारात्मक दृष्टिकोन व त्वरित निर्णय गरजेचे आहेत. जोडीदाराकडून अपेक्षित असलेले सहकार्य मिळणारच आहे.
कुंभ ( शुभ रंग- केशरी)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ गोड बोलून कामे करून घेतील. नोकरदारांनी कामातील चुका टाळाव्यात. आज तब्येतीची ही काळजी घेणे गरजेचे आहे.
मीन ( शुभ रंग – मोरपंखी)
नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या नोकरदारांना नव्या संधी चालून येतील. काहीजण आज काम थोडे बाजूला ठेवूनही करमणुकीस प्राधान्य देतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424