मावळ ऑनलाईन – महाराष्ट्र विधानभवनात आज रोजगार हमी योजनेच्या (Sunil Shelke)अंमलबजावणीला गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत समितीचे अध्यक्ष आमदार सुनील शेळके यांनी ठोस पुढाकार घेत योजनांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेतला आणि प्रशासनाला स्पष्ट दिशा व सूचनांचा पुनरुच्चार केला.
२ ते ४ सप्टेंबर २०२१ रोजी समितीने चंद्रपूर जिल्ह्यात केलेल्या दौऱ्यानंतर योजनेच्या प्रगतीवर नजर टाकण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत आलेल्या अडथळ्यांवर चर्चा करण्यात आली. मुख्य अधिकाऱ्यांची साक्ष घेण्यात आली, तसेच प्रलंबित योजनांना गती देण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
Bicycle rally : सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या सायकल रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद
Hinjawadi IT Park : हिंजवडी आयटी पार्क ‘कोंडीमुक्त’ करण्यासाठी अतिरिक्त ‘वॉर्डन’
बैठकीत मंजूर कामांमध्ये होणाऱ्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त करत, आमदार शेळके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, आणि त्या अनुषंगाने सविस्तर अहवाल समितीला सादर करण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
आमदार शेळके यांनी योजनेचा लाभ गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने सजगतेने काम करावे, असे स्पष्टपणे बजावले. त्यांनी ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धोरणात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज अधोरेखित केली.

बैठकीस समितीचे सदस्य आमदार अमोल जावळे, आमश्या पाडवी, हिकमत उढाण, काशीनाथ दाते, संजय देरकर, सुधाकर अडबाळे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आमदार सुनील शेळके यांनी नेतृत्वद्वारे स्पष्ट केले की रोजगार हमी योजना ही केवळ रोजगारपुरती मर्यादित नसून, ग्रामीण विकासाचे शक्तिशाली साधन आहे. त्यामुळे योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वय वाढवून तातडीने कृती हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
रोजगार हमी योजनेच्या पुढील टप्प्यांत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असून, ही योजना अधिक सक्षम व प्रभावी करण्याचा निर्धार या बैठकीत पुन्हा अधोरेखित करण्यात आला.