मावळ ऑनलाईन – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून गेल्या ( Vadgaon Maval)आर्थिक वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या मावळ तालुक्यातील बँकेच्या लोणावळा शाखा व्यवस्थापक चारुता विशाल कांबळे, वडगाव मावळ, कान्हे- टाकवे शाखा विकास अधिकारी सुजितकुमार शेरे तर धामणे, उर्से, आंबी व इंदोरी या प्राथमिक सहकारी संस्थांचे सचिव गुलाबराव ढोरे यांचा सन्मान करण्यात आला.
पुणे येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी (दि२२) सायंकाळी ६ वाजता संपन्न झालेल्या गुणगौरव व पुरस्कार सोहळ्याचे वितरण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा डॉ दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे व संचालक मंडळ यांच्या शुभहस्ते मावळातील या चारुता कांबळे, सुजितकुमार शेरे, गुलाबराव ढोरे आदी सन्मानार्थींना २०२४-२५ आर्थिक वर्षात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल बँकेचे सन्मान चिन्ह व पुरस्कार देऊन गौरविण्यात ( Vadgaon Maval)आले.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक प्रवीण शिंदे,संभाजी होळकर, संचालिका पूजा बुट्टे पाटीलसह बँकेच्या मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (दि २२) पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील जिल्हा बँकेचे शाखा अधिकारी, विकास अधिकारी व प्राथमिक सहकारी संस्था सचिव यांना उत्कृष्ट कामकाजा बद्दल दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येत असतो. कांबळे, शेरे व ढोरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत ( Vadgaon Maval) आहे.