मावळ ऑनलाईन – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लोकमान्य टिळक यांची जयंती नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये लोकमान्य टिळकांच्या ( Nutan Maharashtra Engineering)प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. एस.एन. संपली, प्रबंधक विजय शिर्के, सुधाकर ढोरे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते.
Lonavala Crime News : लोणावळ्यात साखळी चोरांचा सुळसुळाट,मंगळवारी रात्री घडल्या चोरीच्या दोन घटना
” लोकमान्य बालगंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र चळवळीतील एक महत्वपूर्ण नेते होते. ते एक शिक्षक, संपादक, लेखक आणि वकील होते. सार्वजनिक गणेशोस्तव हा टिळकांनी महाराष्ट्रात सुरु केला,” अशी माहिती प्राचार्य डॉ. एस.एन. संपली यांनी बोलताना ( Nutan Maharashtra Engineering) दिली .
Car vandalism : धनकवडी परिसरात मध्यरात्री 20 गाड्यांची गुंडाकडून तोडफोड
“लोकमान्य टिळक नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि या ऐतिहासिक वारसा असलेल्या पावन भूमी मध्ये आपण कार्य करत आहोत हे आपले भाग्य आहे,” असे उद्गार अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार यांनी बोलताना काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय शिर्के यांनी केले तर आभार सुधाकर ढोरे यांनी ( Nutan Maharashtra Engineering) मानले.