मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – आषाढ – कृष्णपक्ष. तिथी – १३. शके १९४७. वार – बुधवार.तारीख – २३.०७.२०२५ (Rashi Bhavishya 23 July 2025). शुभाशुभ विचार – चतुर्दशी वर्ज्य. आज विशेष – शिवरात्री.राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०. दिशा शूल – उत्तरेस असेल. आज नक्षत्र – आर्द्रा १७.५५ पर्यंत नंतर पुनर्वसू. चंद्र राशी – मिथुन.
—————————-
मेष- (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 23 July 2025
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. काही अति हुशार मंडळींच्या सहवासात मौन बाळगणेच हिताचे राहील. विद्यार्थी आज अभ्यासाचा कंटाळा करतील.
वृषभ (शुभ रंग- क्रीम)
आज तुमची आर्थिक स्थिती भक्कम असेल. विवाहाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना उत्तम स्थळांचे प्रस्ताव येतील. स्पष्ट वक्तेपणामुळे जवळच्या नात्यात काही गैरसमज होतील.
मिथुन (शुभ रंग – पिस्ता)
आज तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल दिवस असून व्यावसायिक अडचणी दूर होतील. आज जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. विरोधकांची पीछेहाट होईल.
कर्क ( शुभ रंग- गुलाबी)
आज कंजूषणाला आवर घालून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. पासपोर्ट, विजा संबंधित कामातील अडचणी दूर होतील.
Ajit Pawar : अजितदादांचं नेतृत्व म्हणजे दिशा, ध्यास आणि दृढनिश्चय – प्रशांत भागवत
सिंह ( शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 23 July 2025
आज राशीच्या लाभातून चंद्र भ्रमण होत असताना उद्योग व्यवसायात काही मनासारख्या घटना घडतील. महत्त्वाची कामे वेळे आधीच विना व्यत्यय पार पडतील.
कन्या (शुभ रंग- आकाशी)
राशीच्या दशमात चंद्रभ्रमण सुरू असताना आळस झटकून कामाला लागावे लागते. आज रिकाम्या गप्प्या टाळून तुम्ही कर्तव्याला प्राधान्य द्याल. व्यस्त दिवस.
तूळ (शुभ रंग- जांभळा)
राशीच्या भाग्यात चंद्रभ्रमण सुरू असताना तुमच्यासाठी प्रसन्न दिवस आहे. आध्यात्मिक उन्नती कडे पावले वळतील. आज सज्जनांचा सहवास लाभेल.
वृश्चिक ( शुभ रंग- केशरी)
कोणतीही धाडसाची कामे आज टाळा. आज जोडीदाराला लाभ होतील. स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यवसायात मोठे आर्थिक धाडस नको.
धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 23 July 2025
कार्यक्षेत्रात वाढती स्पर्धा बेचैन करेल. इतरांच्या विचारांशी जमवून घेणे तुम्हाला अवघड जाईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल.
मकर (शुभ रंग- निळा)
ज्येष्ठ मंडळींना आज काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. नोकरदार वरिष्ठांच्या दडपणात असतील. दुकानदारांची उधारी वसूल होईल.
कुंभ ( शुभ रंग- मोरपंखी)
काही रसिकामंडळी आज काम बाजूला ठेवूनही मौजमजेला प्राधान्य देतील. व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. उंची राहणीमानाकडे तुमचा कल असेल.
मीन ( शुभ रंग – सोनेरी)
राशीच्या चतुर्थात चंद्रभ्रमण होत असताना तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धीच होणार आहे. मुले तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील. आज आईच्या शब्दाला मान द्या.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424