मावळ ऑनलाईन – आजचे पंचांगमहिना – आषाढ – कृष्णपक्ष. तिथी – १२, शके १९४७. वार – मंगळवार. तारीख – २२.०७.२०२५ (Rashi Bhavishya 22 July 2025). शुभाशुभ विचार – क्षयतिथी. आज विशेष – भौमप्रदोष. राहू काळ – दुपारी ०३.०० ते ०४.३०. दिशा शूल – उत्तरेस असेल. आज नक्षत्र – मृग १९.२५ पर्यंत नंतर आर्द्रा. चंद्र राशी – वृषभ ८.१५ पर्यंत नंतर मिथुन.
—————————-
मेष- (शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 22 July 2025
वाढत्या कौटुंबिक गरजा पूर्ण करताना जमाखर्चाचा समतोल बिघडेल. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. आपली काही गुपिते उघड होतील. कामापुरतेच बोला.
वृषभ (शुभ रंग- क्रीम)
आज तुमच्यासाठी उत्साह पूर्ण दिवस असून काही मनासारख्या गोष्टी घडतील. प्रिय आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आज परिवारात सुसंवाद राहील.
मिथुन (शुभ रंग – मोरपंखी)
महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. गृहिणींना जमाखर्चाचा मेळ बसवणे अवघड होईल. रात्रीचा प्रवास करणार असाल तर सावध राहावे लागेल.
कर्क ( शुभ रंग- पिस्ता)
व्यवसायात केलेल्या कष्टांचे चीज होईल. यश हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. नोकरदारांना नव्या नोकरीच्या संधी खुणावतील. आजचा दिवस लाभाचा आहे.
सिंह ( शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 22 July 2025
कोणतेही नवे उपक्रम हाती घेण्यासाठी योग्य दिवस आहे. तरुणांच्या महत्त्वकांक्षा वाढतील. प्रमोशनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नोकरदारांना सुखद समाचार येतील.
कन्या (शुभ रंग- आकाशी)
नवीन व्यावसायिकांनी मर्यादेबाहेर आर्थिक धाडस करू नये. नोकरदारांनी वरिष्ठांच्या आज्ञेत राहणे हिताचे राहील. सरकारी नियम मोडल्यास दंड चुकणार नाही.
तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
विवाह जुळवण्या विषयी चर्चा उद्यावर ढकला. कोणतेही धाडस टाळाच. मोठ्या रकमेची निर्माण करताना सावध राहायला हवे. प्रतिकूल दिवस.
वृश्चिक ( शुभ रंग- मोतिया)
आज महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. तुमच्या वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव पडेल. जोडीदाराला दिलेल्या शब्द पाळाल.
धनु (शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 22 July 2025
कार्यक्षेत्रात प्रामाणिक मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना तुमची मते पटवून देता येतील. संध्याकाळी तुम्हाला थोडा थकवा जाणवेल.
मकर (शुभ रंग- पांढरा)
नेहमीच्या त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. आज काही रसिक मंडळी करमणुकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतील फॅशनेबल वस्त्र खरेदी कराल.
कुंभ ( शुभ रंग- मरून)
तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धीच होईल. मुलांची अभ्यासातील कामगिरी समाधानकारक असेल. आज कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा तुम्ही हौशीने पुरवाल.
मीन ( शुभ रंग – निळा)
आज काही कामानिमित्त जास्त वेळ घराबाहेर राहावे लागेल. काही मोफत सल्लागार मंडळी फारच बोअर करतील. मुले आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424