Team My pune city – विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन करण्यासाठी शिक्षक आणि पालक यांनी विशेष प्रयत्न केले (Sahayog Foundation) पाहिजे असे प्रतिपादन सहयोग फाउंडेशनचे सल्लागार सोनबा गोपाळे गुरुजी यांनी केले.
Publication of a book : ‘छोट्या अणूची मोठी गोष्ट’तून माणूसपणाचीही मांडणी – डॉ. श्रीपाल सबनीस
सहयोग फाउंडेशनच्या वतीने टाकवे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अंदर मावळमधील माध्यमिक शाळांना एन एम एम एस शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुस्तक संचाचे वाटप करताना ते बोलत (Sahayog Foundation)होते.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष तथा पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, सहयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप पानसरे,सुदेश गिरमे,प्रकल्प प्रमुख गणेश विनोदे,संकेत जगताप तसेच श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेचे संचालक दत्तात्रय असवले, उद्योजक एकनाथ गाडे, शाळेचे मुख्याध्यापक आनंदा जांभुळकर तसेच परिसरातील माध्यमिक शाळांचे प्रतिनिधी व मुख्याध्यापक यावेळी (Sahayog Foundation) उपस्थित होते.
या वेळी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा केला पाहिजे शाळेने त्यांची तयारी कशी करून घ्यावी याबाबतचे मुख्याध्यापक श्री गायकवाड यांनी मार्गदर्शन केले तर सहयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी टॅलेंट असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना मदत म्हणून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी हे संच दिले असल्याचे संदीप पानसरे यांनी सांगितले
या कार्यक्रमाचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आनंदा जांभुळकर व त्यांचे सहकारी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार सोपान आसवले यांनी (Sahayog Foundation) मानले.