मावळ ऑनलाईन –लोणावळा येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावरील (Lonavala)एका चिक्कीच्या दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले. ही घटना रविवारी (२० जुलै) सकाळी घडली.
याबाबत माहिती अशी कि, जुना पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळा येथे चिक्कीची दुकाने आहेत. पाऊस सुरु असल्याने सुट्टीच्या दिवशी पुणे शहरातून हजारो पर्यटक लोणावळा येथे येतात. त्यामुळे तरुणाने त्याचे दुकान रविवारी सकाळी लवकर उघडले. दुकानात दोन तरुण ग्राहक बनून आले. त्यांनी सुरुवातीला कॅटबरी चॉकलेट मागितले. त्यावेळी आरोपींनी दुकानातील आणि बाहेरील परिस्थितीचा अंदाज घेतला.
दुकानात आणि आजूबाजूला कोणीही नाही, याची खात्री करून आरोपींनी दुकानदाराला पिस्तूल दाखवले. पुस्तूलचा धाक दाखवून आरोपींनी दुकानदार तरुणाला मारहाण केली. दुकानाच्या गल्ल्यातून रोख रक्कम चोरून नेली.
दुकानात आणि आजूबाजूला कोणीही नाही, याची खात्री करून आरोपींनी दुकानदाराला पिस्तूल दाखवले. पुस्तूलचा धाक दाखवून आरोपींनी दुकानदार तरुणाला मारहाण केली. दुकानाच्या गल्ल्यातून रोख रक्कम चोरून नेली.
Talegaon Dabhade: स्वावलंबी शिक्षण ही आताच्या काळाची गरज- बाळा भेगडे
Nigdi: निगडी प्राधिकरण येथे सशस्त्र दरोडा
लोणावळा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप गुप्ता म्हणाले, रविवारी सकाळी घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक आहे. आम्ही सर्व दुकानदार या घटनेमुळे भीतीच्या छायेत आहोत. व्यापाऱ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करून द्यायला हवे. पोलिसांनी गस्त वाढवणे आवश्यक आहे.