मावळ ऑनलाईन – स्वावलंबी शिक्षण ही आताच्या काळाची गरज (Talegaon Dabhade)असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी केले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव कै विष्णू तथा अण्णासाहेब विजापूरकर यांच्या ९९ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अभिवादन सभेत अध्यक्ष स्थानावरून भेगडे बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीक्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्त डॉ ॲड रोहिणी पवार,श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव तथा बाळासाहेब काशीद तसेच संस्थेचे उपाध्यक्ष गणेश खांडगे,सचिव संतोष खांडगे, विश्वस्त दामोदर शिंदे, सोनबा गोपाळे गुरुजी, विनायक अभ्यंकर, शंकर नारखेडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या वतीने लोकमान्य टिळक आदर्श शाळा पुरस्कार ॲड पु वा परांजपे विद्या मंदिर व पवना विद्यामंदिर पवनानगर या शाळांना विभागून देण्यात आला तर गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार मुख्याध्यापक भाऊसाहेब आगळमे यांना देण्यात आला. मावळ भूषण कृष्णराव भेगडे शिक्षकेतर पुरस्कार इंजिनिअरिंग कॉलेजचे रजिस्ट्रार विजय शिर्के यांना देण्यात आला तर दादासाहेब लिमये हस्तलिखिताचा पुरस्कार नवीन समर्थ विद्यालयाच्या निरंजन हस्तलिखिताला देण्यात आला आहे. हे सर्व पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.


या कार्यक्रमात गुरुवर्य आण्णासाहेब विजापूरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून नवीन समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व इशस्तवन सादर केले तर प्रास्ताविक संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी केले याशिवाय त्यांनी संस्थेच्या विविध शाखांमधील उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना ॲड रोहिणी पवार म्हणाल्या की, शाळेत शिकवणारे शिक्षक व शाळेत शिकणारे विद्यार्थी ही शाळा नसून माणूस घडवणारी प्रयोगशाळा असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.
श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद म्हणाले की, देशाचे नेते लोकमान्य टिळक आणि अण्णासाहेब विजापूरकर यांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक शैक्षणिक संस्थेचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर होऊन आज आपण, आपली पुढची पिढी ह्या वटवृक्षाच्या छायेत विसावत आहे. हे किती भाग्यशाली व गौरवशाली बाब असल्याचे हभप काशीद पाटील यांनी सांगितले.
New Maharashtra Engineering : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
Pune: “कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक २०२५ ” व पुणे लिग कबड्डी स्पर्धा
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले की, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकमान्य टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांनी समर्थ विद्यालयाच्या राष्ट्रीय शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. स्वातंत्र्य पूर्वकाळात स्वावलंबी शिक्षण आणि इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त करणाऱ्या देशभक्तीने प्रेरित झालेला तरुण या शाळेमधून निर्माण करण्याचे मोलाचे काम अण्णासाहेब विजापूरकरांनी केल्याचे भेगडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वासंती काळोखे यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप पोटे व बापूसाहेब पवार यांनी केले तर संस्थेचे विश्वस्त विनायक अभ्यंकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमात संस्थेच्या सर्व शाळांमधील इयत्ता१०वी, १२वीमध्ये प्रथम आलेल्या शाळा व विद्यार्थी तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयात चांगली गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून या कार्यक्रमास संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.