राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा विजेता ठरला एअर फोर्सचा दिनेश कुमार
राजस्थानचा मानव सारडा ठरला घाटाचा राजा
मावळ ऑनलाईन – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व (Pune)सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्य स्तरावरील सायकल स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ बारामती येथील ग.दि.मा. सभागृहात महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद आबा पाटील, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री मा. दत्तात्रय भरणे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धा तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धा व संस्थेच्या गुणात्मक वाढीचा आढावा घेतला.
या प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मनिंदर सिंग, आय ए एस विजय सिंह देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष जय पाटील, सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे चेअरमन मा. पुरूषोत्तम जगताप, छत्रपती सह. साखर कारखान्याचे चेअरमन मा. पृथ्वीराज जाचक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माळेगाव सह. साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन संगीता कोकरे, माळेगाव सह. साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड. रवींद्र माने, निलेश टिळेकर, अनिल काटे, शिवाजीराव काळे, कैलास गावडे, सुनील भोसले, सचिन सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मा. ना. मकरंद आबा पाटील म्हणाले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती परिसराचा सामाजिक, शैक्षणिक, शेती इत्यादी क्षेत्राचा विकास केला आहे. हा विकास पाहून आम्हाला प्रेरणा मिळते . आजच्या स्पर्धेच्या युगात खेळाला महत्त्व प्राप्त झाले असून खेळातून यश अपयश पचवण्याची क्षमता खेळाडूंमध्ये विकसित होत असते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही संस्था अतिशय उत्कृष्टरीतीने सायकल स्पर्धेचे आयोजन करते या स्पर्धांमुळे अनेक खेळाडूंना संधी मिळते ही कौतुकास्पद कामगिरी आहे. असे सांगत अजितदादा पवार राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत अशा शुभेच्छा दिल्या.


राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील सायकल स्पर्धेचे आयोजन करून पर्यावरण विषयक जागृती केली जात आहे. दादांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची घोडदौड सुरू आहे. विकासात्मक दृष्टी ठेऊन “लाथ मारेल तिथे पाणी काढेल” या बाण्याने काम करण्याची शैली हे दादांच्या कामाचे वैशिष्ट्ये असून त्यांनी या परिसराचा कायापालट केला आहे. आणि असा विकास फक्त अजितदादाच करू शकतात. असे सांगत आदरणीय अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Sangeeta Bijlani: अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या फार्महाऊसमध्ये चोरी
Pimpri: सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने सनदी लेखापाल परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी सन्मानित
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे (कंसात कि.मी. व वेळ)
- घाटाचा राजा (दिवे घाट) – राष्ट्रीय स्पर्धा – मानव सारडा, राजस्थान (००.०८.०६)
- घाटाचा राजा (दिवे घाट) – राज्य स्पर्धा – सिद्धेश अजित पाटील, कोल्हापूर (००.०८.३२)
१) पुणे ते बारामती पुरुषांसाठी राष्ट्रीयस्तर (१२२ कि.मी.)
प्रथम क्रमांक – दिनेश कुमार, एअर फोर्स (२.२९.५४)
(“कर्तुत्वाचा वारसा, नव्या पिढीस दिशा” स्व. प्रताप शंकर जाधव चषक), द्वितीय क्रमांक -सूर्या रमेश थाथू, महाराष्ट्र (२.३१.३३),
तृतिय क्रमांक – उदय गुलेड, कर्नाटक (२.३५.५८) याने पटकावला.
२) पुणे ते बारामती पुरुषांसाठी राज्यस्तर – (१२२ कि.मी.)
प्रथम क्रमांक – तांबोळी अमन राजअहमद, सांगली (२.३६.२०), द्वितीय क्रमांक – नदाफ निहाल मुसा, सांगली (२.३७.४९), तृतिय क्रमांक – चोपडे हनुमान यशवंत, बीड (२.४०.२७) याने मिळवला.
३) सासवड ते बारामती MTB सायकल खुली स्पर्धा पुरुषांसाठी राज्यस्तर (८५ कि.मी.)
प्रथम क्रमांक – शेख खुददुस, पुणे (२.०३.५९), द्वितीय क्रमांक – सोनवणे योगेश नामदेव, नाशिक (२.१०.२६),तृतिय क्रमांक – मरळ आर्यन संजय, पुणे (२.१०.३३) याने प्राप्त केला.
४) माळेगाव ते बारामती महिलांसाठी राष्ट्रीयस्तर (१५ कि.मी.)
प्रथम क्रमांक – गंगा दांडीन, कर्नाटक (२२.२६.७४), द्वितीय क्रमांक- पूजा बबन दानोले, महाराष्ट्र (२२.२६.७५), तृतिय क्रमांक – श्रावणी परिट , महाराष्ट्र (२२.२६.७६) यांनी पटकावला.
५) सासवड ते बारामती (पोलिस / राज्य कर्मचारी) राज्यस्तरीय (८५ कि.मी.)
प्रथम क्रमांक -शिवम खरात, संभाजीनगर (२.१०.२०) द्वितीय क्रमांक – अमोल क्षिरसागर, सांगली (२.३०.०२) तृतिय क्रमांक – प्रसाद आलेकर, रत्नागिरी (२.३१.१२) याने प्राप्त केला.
६) माळेगाव ते बारामती (राज्य पोलिस/राज्य कर्मचारी महिला राज्यस्तरीय (१५ कि.मी.)
प्रथम क्रमांक – सिद्धी मनोहर वाफेलकर (००.२४.१०), द्वितीय क्रमांक – रूपाली गिरमकर (००.२४.१०) यांनी पटकवला.
सायकल स्पर्धेच्या मार्गावर जागोजागी मोठ्या संख्येने नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून हाती जनजागृती करणारे फलक हाती घेऊन स्पर्धकांचे स्वागत करत त्यांना प्रोत्साहन दिले.
दरम्यान गदिमा सभागृहात जितेंद्र भुरुक प्रस्तुत ‘गितोंका का सफर’ हा मराठी, हिंदी गाणी व नतीयांचा बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण झाले