मावळ ऑनलाईन – मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय संघटनेशी संलग्न असलेल्या मावळ तालुका मराठी पत्रकार संघाशी संलग्न पवन मावळ मराठी पत्रकार संघ या संघाची ( Pawan Maval Journalists) स्थापना शुक्रवारी (दिनांक 18 जुलै) करण्यात आली. पवनानगर येथे झालेल्या कार्यक्रमात मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि पवन मावळ विभागातील सर्व पत्रकार यांच्या उपस्थितीत पवन मावळ विभागातील पत्रकारांच्या हितासाठी सदर संघाची स्थापना करून संघाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये संघाच्या प्रथम तथा नूतन अध्यक्ष पदी सर्वानुमते रवी नामदेव ठाकर यांची निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्ष म्हणून विकास वाजे यांची आणि उपाध्यक्ष म्हणून अभिषेक बोडके यांची निवड करण्यात आली.
सर्वप्रथम मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भारत काळे यांनी कार्यक्रमास आलेल्या सर्वांचे स्वागत करीत कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली व कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार तथा तालुका पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर ठाकर यांनी प्रास्ताविक केले व कार्यक्रमाचे आयोजन आणि संपूर्ण नियोजन याची माहिती दिली.
याप्रसंगी प्रास्ताविक करीत असतानाच ज्ञानेश्वर ठाकर यांनी पत्रकारितेचा अनुभव सांगत, पवन मावळ विभागातील पत्रकार व पत्रकारिता याबद्दल आपले अनुभव व्यक्त केले. तसेच नव्याने स्थापन होत असलेल्या पवन मावळ मराठी पत्रकार संघास शुभेच्छा देत, पुढे जाण्यासाठी आवश्यक सूचनाही केल्या.
तदनंतर कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथी यामध्ये मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक( Pawan Maval Journalists) तथा अध्यक्ष सुरेश गिरमे, संघाचे सल्लागार तथा जेष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे गुरुजी, सल्लागार बबनराव बसे सर, सचिव रामदास वाडेकर, तळेगाव पत्रकार संघाच्या अध्यक्षा रेश्मा फडतरे, कामशेत पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन वाघमारे, तालुका पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार अॅड. किशोर ढोरे, खजीनदार संकेत जगताप, पत्रकार केदार शिरसाठ या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील पुणे दौऱ्यावर
यानंतर मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव रामदास वाडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत पवन मावळ मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणीची घोषणा केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पवन मावळ मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवी ठाकर, कार्याध्यक्ष विकास वाजे, उपाध्यक्ष अभिषेक बोडके, सचिव राहुल सोनवणे, प्रसिद्धीप्रमुख बाबुराव काळे, खजिनदार उत्तम ठाकर, प्रकल्प प्रमुख प्राची केदारी, सल्लागार ज्ञानेश्वर ठाकर यांचा व सदस्य यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभनंतर संघाचे नूतन अध्यक्ष रवी ठाकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये, संघातील सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आणि पत्रकारांच्या हितासाठी काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानंतर मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदसिद्ध सदस्या तथा तळेगाव पत्रकार संघाच्या अध्यक्षा रेश्मा फडतरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून संघाच्या वाटचालीस शुभेच्छा ( Pawan Maval Journalists) दिल्या.
मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे यांनी मनोगत व्यक्त केले, यात त्यांनी तालुका स्तरावरील संघाची स्थापना, त्याची गरज आणि उद्देश यांच्यावर भाष्य केले. तसेच तालुक्यातील पत्रकारांच्या हितासाठी राबवित असलेल्या व भविष्यात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. पवन मावळ मराठी पत्रकार संघ स्थापन होत असून त्यालाही शुभेच्छा देत तालुका पत्रकार संघ नेहमी पाठीशी राहील, असा विश्वास दिला.
यानंतर ज्येष्ठ पत्रकार बबनराव भसे सर यांनी मार्गदर्शन केले, यात त्यांनी पवन मावळ मराठी पत्रकार संघ याने आपले स्वतंत्र अस्तित्व जपत तालुका पत्रकार संघासोबत काम करण्याचा सल्ला दिला. आणि संघटनेच्या कामकाजाबाबत एकसूत्रता व एक वाक्यता राहावी याकरिता मोलाचे मार्गदर्शन केले.
अखेरीस ज्येष्ठ पत्रकार व सल्लागार सोनबा गोपाळे गुरुजी यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. तालुक्यातील पत्रकारांच्या हितासाठी एक तालुकास्तरीय संघ असावा, हे स्वप्न मावळ तालुका मराठी पत्रकार संघ या रूपाने साकार झाले याबद्दल आनंद होत असल्याचे ( Pawan Maval Journalists) सांगितले.
पवन मावळ मराठी पत्रकार संघ या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकारांच्या हितासाठी लढणाऱ्या संघाची स्थापन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत संघाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मावळ तालुका मराठी पत्रकार संघ च्या माध्यमातून यापुढे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे, त्यातून पत्रकारांच्या हितासाठी आवश्यक या गोष्टी करत असताना सामाजिक हिताचे उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही दिली.
पत्रकारांसाठी तालुक्यात पत्रकार भवन होत असून त्याबद्दल लोकप्रतिनिधींची चर्चा सुरू असल्याचेही सांगितले. तालुक्यात लवकरच अस्थायी स्वरूपात कार्यालय उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच सर्व पत्रकारांनी प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा मोलाचा सल्ला देत संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यानंतर पवन मावळ मराठी पत्रकार संघाचे सदस्य व वडगाव शहर मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विशाल कुंभार यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, अतिथी आणि पवन मावळ मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी पदाधिकारी, सदस्य यांचे आभार मानले.
यासह मावळ तालुका मराठी पत्रकार संघाने ग्रामीण भागात काम करणारे पत्रकार म्हणून पवन मावळ मराठी पत्रकार संघातील सदस्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची अपेक्षा व्यक्त करून आभार प्रदर्शन पूर्ण केले. अखेरीस रुचकर भोजनासह कार्यक्रमाची सांगता झाली. अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.
पवन मावळ मराठी पत्रकार संघाची एक वर्षासाठी नियुक्त करण्यात आलेली नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे ( Pawan Maval Journalists)
रवी ठाकर (अध्यक्ष), विकास वाजे (कार्याध्यक्ष), अभिषेक बोडके (उपाध्यक्ष), राहुल सोनवणे (सचिव), बाबुराव काळे (प्रसिद्धीप्रमुख), उत्तम ठाकर (खजिनदार), प्राची केदारी (प्रकल्प प्रमुख), ज्ञानेश्वर ठाकर (सल्लागार) यासह भारत काळे, सचिन शिंदे, बद्रीनारायण पाटील, विशाल कुंभार, रेखा भेगडे, योगेश घोडके, सुभाष भोते, नामदेव घरदाळे, प्रफुल्ल ओव्हाळ, संतोष थिटे, रमेश फडतरे, निलेश ठाकर हे कार्यकारणी सदस्य आहेत.