मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – आषाढ – कृष्णपक्ष. तिथी – ९. शके १९४७. वार – शनिवार. तारीख – १९.०७.२०२५. (Rashi Bhavishya 19 July 2025)
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – पुष्य रवी.
राहू काळ – सकाळी ०९.०० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – भरणी. चंद्र राशी – मेष.
मेष- (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 19 July 2025
आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा हट्ट असेल. इतरांचही म्हणणे समजून घेणे हिताचे राहील. बेरोजगारांना घरापासून लांब रोजगार प्राप्ती होईल.
वृषभ (शुभ रंग- मोतिया)
घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही सौम्य मतभेद होऊ शकतात. खर्चाचे प्रमाण कमी करूनच आज जमाखर्चाचा तराजू समतोल ठेवता येईल.
मिथुन (शुभ रंग – मरून)
आज राशीच्या लाभातील चंद्र तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्ती करेल. पैशा अभावी रखडलेली कामे सुरू करता येतील. संततीचे विवाह योग जुळून येतील.
कर्क ( शुभ रंग- पिस्ता)
उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेने तुम्ही जरा त्रासलेले असाल. आज तुम्हाला कुटुंबीयांना वेळ देणे अवघड जाईल. वरिष्ठांनी दिलेली आश्वासने फार मनावर घेऊ नका.
Ravet : रावेत मध्ये 30 हजारांची लाच घेताना महिला पोलिस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात
सिंह ( शुभ रंग- भगवा) Rashi Bhavishya 19 July 2025
आज तुमची आध्यात्मिक मार्गाकडे रुची वाढेल. काही नास्तिक मंडळी ही आज मंदिराच्या रांगेत निमूटपणे उभी राहतील. संध्याकाळी एखाद्या सत्संग घडेल.
कन्या (शुभ रंग- मोरपिशी)
जे आपले काम नाही त्यात उगीच वेळ वाया घालवू नका. धाडसाची कामे तर टाळच. आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. जोडीदाराच्या चुका काढू नका.
तूळ (शुभ रंग- हिरवा)
अति उत्साहात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. अति आक्रमकता टाळावी. अडचणीच्या प्रसंगी तुम्हाला जोडीदार योग्य सल्ले देऊ शकेल.
वृश्चिक ( शुभ रंग- डाळिंबी)
आज खर्चाचे प्रमाण आवाक्या बाहेर जाणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल. प्रवासात आरोग्य बिघडेल. काळजी घ्या.
धनु (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 19 July 2025
सौंदर्य प्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. नोकरदार मंडळी नोकरीत बदल करण्यासाठी उत्सुक असतील.
मकर (शुभ रंग- चंदेरी)
वास्तु वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील. घरात सज्जनांची येजा राहील. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना परिश्रम वाढवावे लागणार आहेत.
कुंभ ( शुभ रंग- निळा)
महत्त्वाच्या कामासाठी तुमची भटकंती होणार आहे. प्रवासात झालेल्या नव्या ओळखींचे मैत्रीत रूपांतर होईल. तुमच्यातील सकारात्मकता वाढेल. आशादायी दिवस.
मीन ( शुभ रंग – केशरी)
आज आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही उत्तम असेल. प्रभावी वक्तृत्वाने आज तुम्ही विरोधकांनाही आपलेसे कराल. शब्द जपून वापरा.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424