मावळ ऑनलाईन – लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या(Lonavala) शहराध्यक्षपदी रवींद्र दत्तात्रय पोटफोडे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत घोषित करण्यात आली.
रवींद्र पोटफोडे यांनी याआधी पक्षाचे शहर कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. कार्यकर्त्यांशी असलेल्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या संबंधामुळे शहरातील पक्ष वाढीमध्ये त्यांचा मोठा वाटा समजला जातो. त्यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व पक्षीय अध्यक्ष व पदाधिकाऱ्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
Chikhali Residents : चिखली घरकुलवासीयांची घरपट्टी माफ करा!
Talegaon Dabhade: रोटरी सिटी आयोजित शौर्य गौरव पुरस्कार समारंभ संपन्न!
त्यांच्या निवडीबदल बोलताना रवींद्र पोटफोडे म्हणाले की आमदार सुनील शेळके व तालुक्यातील ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मी पक्ष वाढीचे काम करीन. तसेच आगामी लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळावे यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन असा विश्वास यावेळी त्यांनी बोलून दाखवला.