मावळ ऑनलाईन – पार केलेल्या कारची काच फोडून गाडीतून सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना वडगाव मावळ (Vadgaon Maval Crime News) येथील दत्त मंदिर परिसरात बुधवारी (दि.16) दुपारी सव्वा तीन ते पावणे पाच या कालावधीत घडली.
Palkhi ceremony : ज्ञानोबा -तुकोबा पालखी सोहळ्यांच्या आगमनानिमित्त आळंदीत स्वच्छतेची मागणी
याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुरुवारी सुरज बाळू ठाकर (वय 22 रा.माळेगाव मावळ) यांनी फिर्यादी आहे. यावरून आज्ञा चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची कार वडगाव मावळ येथील दत्त मंदिर समोर पार्क केली होती. यावेळी अज्ञात चोराने कार ची पाठीमागची काच फोडून कार मधील कापडी पिशवी चोरून नेली ज्यामध्ये 1 लाख 25 हजार रुपये रोख व कागदपत्रे होती. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Vadgaon Maval Crime News) आहेत.