situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Clean Lonavala : सुपर स्वच्छ लीगमध्ये लोणावळ्याला प्रथम क्रमांक; पाच स्टार मानांकन व ‘वॉटर प्लस’ दर्जा कायम

Published On:

‘स्वच्छ भारत अभियाना’त लोणावळा नगरपरिषदेची (Clean Lonavala) राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी

मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील लोणावळा नगरपरिषदेने ‘स्वच्छ भारत अभियान २०२४-२५’ अंतर्गत ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष गटात (Clean Lonavala) देशपातळीवर उजवा ठसा उमठवत मोठा सन्मान पटकावला आहे. स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या या नगरपरिषदेचा गौरव १७ जुलै रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला. लोणावळ्याला सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्वच्छतेच्या क्षेत्रात सातत्याने प्रगती साधणारी संस्था म्हणून लोणावळा नगरपरिषदेची ओळख निर्माण झाली आहे. २०२१ पासून विविध राष्ट्रीय उपक्रमांतून मिळालेल्या मान्यतेनंतर यंदाच्या स्पर्धेत नव्याने तयार झालेल्या ‘सुपर स्वच्छ लीग’ गटात लोणावळ्याने (Clean Lonavala) नवी दिल्ली, अंबिकापूर, तिरुपती अशा प्रगत शहरांशी लढत देत उल्लेखनीय कामगिरी बजावली.

PCMC : पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात सर्वप्रथम स्वच्छतेमध्ये दमदार वाटचाल

याशिवाय, ‘कचरामुक्त शहर’ उपक्रमांतर्गत लोणावळ्याने पाच स्टार रेटिंग मिळवले असून, ‘वॉटर प्लस’ दर्जा देखील यशस्वीरित्या कायम राखला आहे. त्यामुळे ५० हजार ते ३ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान लोणावळ्याला मिळाला.

नवी दिल्लीतील पारितोषिक वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत लोणावळा नगरपरिषदेचे (Clean Lonavala) मुख्याधिकारी अशोक साबळे, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता यशवंत मुंडे यांनी पुरस्कार स्वीकृत केला. उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी संतोष खाडे, विवेक फरतडे आणि मुकादम यशवंत वाघमारे यांचीही उपस्थिती यावेळी होती.

Maval Panchayat Samiti : मावळ पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटांची फेररचना

या यशाबद्दल समाधान व्यक्त करत मुख्याधिकारी अशोक साबळे म्हणाले, “शहराची स्वच्छता ही केवळ यंत्रणांची जबाबदारी नसून, ती एकसंध नागरिकांच्या सहभागातून साध्य होते. लोकप्रतिनिधी, अधिकारी, सफाई कर्मचारी आणि सामाजिक संस्थांची एकजूट हेच या यशाचे खरे गमक आहे. हे सातत्य टिकवून लोणावळा राष्ट्रीय मानांकनात अग्रस्थानी राहील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

Follow Us On