मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग – महिना – आषाढ – कृष्णपक्ष. तिथी – ८, शके १९४७. वार – शुक्रवार. तारीख – १८ जुलै २०२५ (Rashi Bhavishya 18 July 2025) शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.आज विशेष – सामान्य दिवस.राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.दिशा शूल – पश्चिमेस असेल.आज नक्षत्र – अश्विनी.चंद्र राशी – मेष.
—————————-
मेष- (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 18 July 2025
आज तुम्ही कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांना चांगला वाव मिळेल. आज उत्साही दिवस आहे.
वृषभ (शुभ रंग- गुलाबी)
व्यवसायात जमाखर्चाचे गणित बिघडेल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे. घरात थोरांनी केलेले उपदेश ऐकून घ्यावे लागतील. आज कमीच बोला.
मिथुन (शुभ रंग – निळा)
धंद्यातील येणे वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढणार आहे. आजचा दिवस लाभाचा असल्याने जसे चिंताल तसेच होईल. शुभच चिंता.
कर्क ( शुभ रंग- मोतिया)
उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेला समर्थपणे तोंड द्याल. वरिष्ठ नोकरदारांवर वाढीव जबाबदाऱ्या सोपवतील. आज तुम्हाला कुटुंबीयांना वेळ देणे अवघड जाईल.
Maval Panchayat Samiti : मावळ पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटांची फेररचना
सिंह ( शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 18 July 2025
कोणत्याही क्षेत्रातील तुमच्या प्रामाणिक मेहनतीस दैवाची साथ मिळेल. ज्येष्ठ मंडळी सत्संगात रमतील. घरात धार्मिक कार्य करण्याची इच्छा होईल.
कन्या (शुभ रंग- क्रीम)
कार्यक्षेत्रात तुमची व्यस्तता वाढेल. आज तुम्हाला पूर्वीच्या काही चुका निस्तराव्या लागतील. संध्याकाळी गाडी चालवताना वेगावर नियंत्रण गरजेचे आहे.
तूळ (शुभ रंग- पिस्ता)
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नव्या ओळखी व्यवसाय वृद्धीच्या कामी येतील. आज जोडीदाराला अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी तुमच्या हातून होईल.
वृश्चिक ( शुभ रंग- भगवा)
काही येणी असतील तर ती वसूल होण्यासाठी मागावी लागणार आहेत. आज तुमचे हितशत्रूही मित्रांमध्येच लपून बसलेले असतील. सतर्क रहा.
धनु (शुभ रंग- केशरी) Rashi Bhavishya 18 July 2025
योग्य आर्थिक नियोजन व वेळेचा सदुपयोग करून ध्येयाकडे वेगाने वाटचाल करता येईल. उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. कलाकारांना ग्लॅमर मिळेल.
मकर (शुभ रंग- सोनेरी)
मंदावलेले घरगुती उद्योग नव्याने कार्यरत करू शकाल. पारिवारिक सदस्यात सामंजस्याची भावना राहील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.
कुंभ ( शुभ रंग- पांढरा)
आज तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड उत्साह राहील. तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाणार आहे. मुलांना तर आज अभ्यास कंटाळवाणा वाटेल.
मीन ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज आवश्यक असलेला पैसा सहज उपलब्ध होईल. वादविवादात आज तुमचीच सरशी होईल. तरीही नाती जपण्यासाठी आज कठोर शब्दप्रयोग टाळावे.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424