मिडलाईन व स्वास्तिक संघानी तर महिला विभागात बारामती स्पोर्टस् व स्वराज्य संघानी आपआपल्या गटात मिळविले विजय
मावळ ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी (Kabaddi Tournament) असोसिएशनच्या सहकार्याने “ सतेज संघ,बाणेर यांच्या वतीने “ कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक निमंत्रित पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा – २०२५ व “ बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या विद्यमाने पुरुष व महिला “ पुणे लिग कबड्डी स्पर्धा २०२५ ” या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात राज्यस्तरीय निमंत्रित स्पर्धेत पुरुष विभागात अत्यंत चुरशिच्या झालेल्या सामन्यात चंदुकाका जगताप क्रीडा संघाने नंदूरबार संघावर ३४-३१ असा विजय मिळविला.
मध्यंतराला चंदुकाका जगताप क्रीडा संघ १०-१९ असा पिछाडीवर होता. मध्यंतरानंतर चंदुकाका जगताप संघाने आपली रणनिती बदलत आक्रमक खेळाला सुरवात केली. चंदुकाका जगताप संघाच्या सिध्दार्थ गायकवाड व आकाश दिसले यांनी आक्रमक खेळ करीत नंदुरबारचा बचाब भेदला विजय मिळविला. तुषार आधवडे व अक्षय बोडके यांनी सुरेख पकडी घेतल्या.
नंदुरबारच्या ओंकार गाडे व असिम शेख यांनी पहिल्या डावात सुरेख खेळ केला मात्र मध्यंतरानंतर त्यांचा प्रभाव कमी झाला व त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दादासाहेब आवा़ड व श्रेयश उंबरदंड यांनी चांगल्या पकडी केल्या. दुसऱ्या सामन्यात मिडलाईन संघाने भैरवनाथ क्रीडा संस्था संघावर ३७-३५ अशा निसटता विजय मिळविला. मध्यंतराला मिडलाईन संघाकडे २६-२० अशी (Kabaddi Tournament) आघाडी होती.
Alandi : आळंदी नगरपरिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार
मिडलाईन संघाच्या आर्यन ढवळे याने जोरदार खेळ केला. वैभव मोरे याने पकडी केल्या. भैरवनाथ क्रीडा संस्था संघाच्या आदित्य चौगुले, याने एकाकी प्रतिकार केला. तर कृष्णा शिंदे यांनी पकडी केल्या. उपनगरच्या स्वास्तिक संघाने कोल्हापूरच्या शाहू सडोली संघावर ३४-३० असा विजय मिळविला.

मध्यंतराला स्वास्तिक संघाकडे २१-१९ अशी आघाडी होती. स्वास्तिक संघाकडे अमित चव्हाण व अक्षय बरडे यांनी जोरदार खेळ केला. त्यांना अशोक विटकर याने पकडी घेतल्या. शाहू सडोली संघाच्या भूषण पाटील याने सुरेख चढाया केल्या. तर प्रसाद मगदुम यांने पकडी घेतल्या.
महिला विभागात बारामती स्पोर्टस् अॅकॅडमी संघाने मुंबईच्या शिवशक्ती महिला संघावर ३२-२१ अशी मात करीत विजय नोंदविला. मध्यंतराला बारामती स्पोर्टस् संघाकडे १२-१० अशी निसटती आघाडी होती. बारामती स्पोर्टसच्या निकीता खाडे व मिताली बारटक्के यांनी जबरदस्त आक्रमक खेल करीत तुल्यबळ अशा शिवशक्ती महिला संघाला नामोहरम केले. त्यांना सृष्टी मोरे व प्रिया निंबाळकर यांनी पकडी घेत चांगली साथ दिली. शिवशक्ती संघाच्या रक्षा नारकर व आदिती शिंदे यांनी जोरदार प्रतिकार (Kabaddi Tournament) केला. पोर्णिमा जेधे व जयश्री शिंगाडे यांनी पकडी घेतल्या.
महिलांच्या झालेल्या दुसऱ्या सामन्यात उपनगरच्या स्वराज्य संघाने पिंपरी चिंचवडच्या कला क्रीडा विकास प्रकल्प संघावर २३-२२ अशा निसटता विजय मिळविला. स्वराज्य संघाच्या सरीना म्हसकर व यशिका पुजारी यांनी चौफेर चढाया करीत मैदान गाजविले. तर समृध्दी मोहिते व सानिया इंगळे यांनी सुरेख पकडी घेतल्या. कला क्रीडा विकास प्रकल्प संघाच्या किर्ती गडगंजी व रेखा राठोड यांनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र त्यांना विजय मिळविण्यात यश आले नाही. सिफा वस्ताद व सविता गवळी यांनी चांगल्या पकडी Kabaddi Tournament) केल्या.