मावळ ऑनलाईन – मावळातील औंढे गावच्या खाडेवाडी परिसरातील एका गाईच्या गोठ्यात आज सकाळच्या सुमारास 10 फूट लांबीचा अजगर (Maval Paython) आढळून आला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सर्पमित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू करत अजगराचे प्राण वाचवले.
या अजगराची पहिली माहिती स्थानिक नागरिक सोनु खाडे यांनी सर्पमित्र मोरेश्वर मांडेकर यांना दिली. त्यानंतर लोणावळा विभागातील सर्वात अनुभवी सर्पमित्र म्हणून ओळख असलेले सर्पमित्र शेळके उर्फ शेळके मामा यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत सुरक्षित पद्धतीने अजगराला (Maval Paython) पकडले. संपूर्ण रेस्क्यू काळजीपूर्वक पार पडल्यानंतर अजगराला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
Krishnarao Bhegde : कृष्णराव भेगडे चालते बोलते विद्यापीठ -प्राचार्य डॉ. संभाजी मलघे
Chakan Crime News : शेलपिंपळगावमध्ये दरोडा; ५ लाखांचा ऐवज लंपास
या वेळी घटनास्थळी सोनु खाडे, सर्पमित्र शेळके मामा, दिनेश खाडे, विलास कुंभार, ह.भ.प. संतोष महाराज घनवट, रामदास मेमाणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबतची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांनी दिली.