मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – आषाढ – कृष्णपक्ष. तिथी – ६. शके १९४७. वार – बुधवार. तारीख – १६.०७.२०२५ (Rashi Bhavishya 16 July 2025)
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा. चंद्र राशी – मीन.
मेष- (शुभ रंग- मरून) Rashi Bhavishya 16 July 2025
कार्यालयीन कामासाठी तातडीचे प्रवास घडतील. इम्पोर्ट-एक्स्पोर्टचे व्यवसाय तेजीत चालतील. वाढत्या खर्चात जमाखर्चाचा तराजू डळमळीत होईल.
वृषभ (शुभ रंग- भगवा)
आज तुमच्यासाठी लाभाचा दिवस आहे. कोणत्याही नव्या उपक्रमाची सुरुवात आज यशस्वीपणे करता येईल. मित्र आज दिलेली आश्वासने पाळतील.
मिथुन (शुभ रंग – मोरपंखी)
आज कोणतीही गोष्ट सहजच मिळेल या भ्रमात राहू नका. कष्टाचे फळ मात्र नक्कीच मिळेल. नकारात्मक मनोवृत्तीच्या मंडळींपासून दूर रहा. व्यर्थ वाद टाळा.
कर्क ( शुभ रंग- भगवा)
आज चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यातून होत असताना ज्येष्ठांचा देवधर्म व दानधर्माकडे कल वाढेल. श्रद्धाळू ना उपासनेची प्रचिती येईल. मनाला प्रसन्न वाटेल.
Dehugaon: तब्बल १७ वर्षांनंतर तुकोबांची पालखी आळंदी मार्गे देहूत परतणार
सिंह ( शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 16 July 2025
जे कळत नाही त्यात वेळ वाया घालवू नका नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करा. न जपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकणं हिताचे राहील.
कन्या (शुभ रंग- डाळिंबी)
व्यवसायात चढाओढ वाढलेली असताना निर्णय घ्यायला विलंब लावू नका. पूर्वीची चूक परत करू नका. वैवाहिक जीवनात जुने विषय उगाळू नका.
तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा जोर वाढलेला असताना क्षुल्लक चुका करून त्यांना आयती संधी देऊ नका. नोकरदारांनी फक्त वरिष्ठांच्या आज्ञा पाळाव्यात.
वृश्चिक ( शुभ रंग- निळा)
कार्यक्षेत्रात नवीन विषय शिकण्याची संधी चालून येईल. उच्चशिक्षित मंडळींच्या अपेक्षा वाढतील. नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल.
Shirgaon: घरफोडीतील २५ लाखांचे सोने हस्तगत; गुन्हे शाखा युनिट-५ ची मोठी कामगिरी
धनु (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 16 July 2025
वास्तु वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील. आज काही आवडते पाहुणे घरी पाय धुळ झाडतील. विद्यार्थी आज पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील.
मकर (शुभ रंग- क्रीम)
व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजू नका. आपल्या भावी योजना जाहीर करण्याची घाई करू नका. गृहिणींनी झाकलेली मूठ झाकली ठेवणे हिताचे राहील.
कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)
आज तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने मनस्थितीही उत्तम असेल. आज कुणाला सल्ले देण्यापेक्षा गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्यावा.
मीन ( शुभ रंग – जांभळा)
आज तुम्ही जरा हट्टीपणाने वागाल. इतरांशी जमवून घेणे अवघड जाईल. उगीच वाद ओढवून घ्याल. जोडीदाराकडे मात्र मन मोकळे करावेसे वाटेल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424