situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Khandala Ghat Accident : खंडाळा घाटात ट्रकमधून पडलेल्या पाईपमुळे दोन महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Published On:
Khandala Ghat Accident

मावळ ऑनलाईन – जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा घाटातील मॅजिक पॉइंट परिसरात शनिवारी (12) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ट्रकमधून वाहतूक केलेले लोखंडी पाईप अचानक मागे सरकल्याने मागून येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनावर पडले आणि हा ( Khandala Ghat Accident ) अपघात घडला.

या धडकेत दुचाकीवरील ऋतुजा चव्हाण (२६, रा. वारजे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत मागे बसलेले वैभव गलांडे (२९) गंभीर जखमी झाले.

त्याचप्रमाणे, या ट्रकच्या मागून येणाऱ्या कारवर देखील पाइप्स कोसळल्याने कारमध्ये बसलेल्या अंकिता शिंदे (२८, रा. नेरे, मुळशी) यांचा देखील मृत्यू झाला. कारमधील अन्य प्रवासी सोनाली खडेत्रे (३३), शिवराज खडेत्रे (६), लता शिंदे (५०, सर्व रा. वारजे) व ललित शिंदे (३०, रा. नेरे) हे गंभीर जखमी झाले आहेत.

Pune:हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्याला अध्यात्मिक साधनेची जोड हवी – दादा वेदक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास खोपोलीहून पुण्याकडे जाणाऱ्या एका ट्रकने खंडाळा घाट चढताना अचानक ब्रेक मारल्याने ट्रकमधील लोखंडी पाईप घसरले. हे पाईप थेट ट्रकच्या मागून येणाऱ्या दुचाकी आणि कारवर ( Khandala Ghat Accident ) कोसळले. 

अपघाताची माहिती मिळताच दस्तुरी (बोरघाट) महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील, खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे, पोलीस हवालदार अमोल धायगुडे यांच्यासह देवदूत आपत्कालीन पथक, आयआरबी पेट्रोलिंग आणि डेल्टा फोर्सच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करत पाइपखाली अडकलेल्या महिलांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला ( Khandala Ghat Accident ) होता.

Rashi Bhavishya 14 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

जखमींना तत्काळ खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. या अपघाताचा तपास खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमोल धायगुडे करत ( Khandala Ghat Accident ) आहेत.

Follow Us On