situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 14 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 28 August 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – आषाढ – कृष्णपक्ष. तिथी – ४. शके १९४७. वार – सोमवार. तारीख – १४.०७.२०२५ (Rashi Bhavishya 14 July 2025).
शुभाशुभ विचार – शुभ दिवस.
आज विशेष – संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय २१.५८).
राहू काळ – सकाळी ०७.३० ते ०९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – धनिष्ठा ०६.४९ पर्यंत नंतर शततारका. चंद्र राशी – कुंभ.

मेष- (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 14 July 2025
राशीच्या लाभातील चंद्र आज हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश देईल. काही मंदावलेले व्यवसाय गती घेतील. दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.

वृषभ (शुभ रंग- चंदेरी)
नोकरदारांच्या कामावरील निष्ठेची आज वरिष्ठ दखल घेतील. रिकाम्या गप्पा टाळून फक्त कृतीला प्राधान्य दिल्यास आजचा दिवस तुमच्यासाठी यशदायी आहे.

मिथुन (शुभ रंग – आकाशी)
आज महत्त्वाच्या कामात काही अनपेक्षित अडचणी येतील. जेष्ठ मंडळी पूजा पाठात रमतील. वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करा. मोठ्यांच्या वयाचा मान राखा.

कर्क ( शुभ रंग- जांभळा)
राशीच्या अष्टमातून चंद्रभ्रमण चालू आहे. कोणतीही धाडसाची कामे आज टाळावीत. वाहन चालवताना काळजी घ्या. शेअर्स मार्केट पासून लांबच रहा.

Traffic congestion: तळेगाव-चाकण मार्गावरील वाहतूक कोंडी चिंताजनक; मावळमित्र समितीकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी

सिंह ( शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 14 July 2025
आज तुमच्यासाठी आनंदी व उत्साही दिवस. कौटुंबिक सदस्यात सुसंवाद राहील. एखादे सरप्राईज गिफ्ट देऊन तुम्ही आपल्या जोडीदाराचे मन जिंकाल.

कन्या (शुभ रंग- क्रीम)
नोकरदारांवर कामाचा ताण वाढलेला असेल. आज तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. क्षुल्लक दुखणेही अंगावर काढू नका. आज बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल.

तूळ (शुभ रंग- केशरी)
बऱ्याच दिवसांनी एखाद्या प्रिय व्यक्तीचा अनपेक्षित फोन येईल. तरुण मंडळी पावसाळी सहलींचे बेत आखतील. येणी असतील तर मागायला लाजू नका.

वृश्चिक ( शुभ रंग- निळा)
कलाकारांना कामासाठी भटकंती करावी लागेल. खेळाडूंना सराव वाढवावा लागणार आहे. गृहिणींना घरातील मोठ्यांचे मानपान जपावे लागतील.

Pravin Gaikwad :संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासले,अक्कलकोट मध्ये राडा

धनु (शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 14 July 2025
कामानिमित्त जास्त वेळ घराबाहेरच राहाल. काहींना किरकोळ घर दुरुस्तीची कामे हाती घ्यावी लागतील. आज तुमची काही गुपिते उघड होतील. कमीच बोला.

मकर (शुभ रंग- मरून)
आज तुम्ही आनंदी व सकारात्मक असाल. रुटीन कामातून थोडासा मौजमजेसाठी वेळ काढाल. कुटुंबीयांना पुरेसा वेळ देऊन मुलांचेही लाड पुरवाल.

कुंभ ( शुभ रंग- मोरपंखी)
मनाच्या लहरीपणाला आवर घालणे गरजेचे आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मिळून मिसळून वागावे. आपलेच खरे करण्याचा अट्टाहास नको.

मीन ( शुभ रंग – भगवा)
आज काही दूरचे नातलग संपर्कात येतील. देणी-घेणी लिखित स्वरूपात असू द्यात. वृद्धांनी तळपायांची काळजी घ्यायला हवी. अनावश्यक खर्चावर ताबा ठेवा.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On