situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Traffic congestion: तळेगाव-चाकण मार्गावरील वाहतूक कोंडी चिंताजनक; मावळमित्र समितीकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Published On:

मावळ ऑनलाईन –तळेगाव-चाकण रस्त्यावरील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक आणि त्यातून निर्माण होणारी तीव्र वाहतूक कोंडी ही स्थानिक नागरिक, प्रवासी व व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी मावळमित्र जनआंदोलन समितीचे प्रमुख सुशील सैंदाणे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी खालील महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत:

१) तळेगाव-चाकण रस्त्याचा दोन्ही बाजूंनी विस्तार
सद्यस्थितीत हा रस्ता अरुंद असून त्यावर मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून दोन्ही बाजूंनी किमान १० फूट रुंदीकरण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.

Pune Terrorist Case : पुण्यातील घातपात प्रकरणातील संशयित दहशतवाद्याला अटक

२) अंतर्गत कॉलनी जोडणी व वाहतूक सुलभीकरण
चाकण रस्त्यालगतच्या विविध वसाहती एकमेकांशी जोडल्यास वाहतुकीचा भार कमी होऊ शकतो. माळवाडी ते तळेगाव रेल्वे पूल दरम्यान अंतर्गत रस्त्यांचे जाळे उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे.

३) विकास आराखड्यातील रस्त्यांचा वापर (DP Roads)
सद्यस्थितीत नकाशात दाखवलेले रस्ते प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत. हे रस्ते पूर्णत्वास नेल्यास वाहतूक विविध मार्गांनी विभागता येईल.

४) माळवाडी – डेपो – बेगडेवाडी मार्गाचे रुंदीकरण
या मार्गाचे संरक्षण विभागाशी समन्वय साधून मजबुतीकरण करावे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वळवता येईल, असे त्यांनी सांगितले.

५) देहूफाटा मार्गे जुना हायवे जोडणी
देहूफाटा ते देहूरोड मार्ग अत्यंत अरुंद असून वाहने अडखळतात. संरक्षण विभागाच्या सहकार्याने या मार्गाचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करणे आवश्यक आहे.

६) कुंडमळा पूल आणि इंदोरी रस्ता सुधारणा
सध्या पडलेला कुंडमळा पूल व संबंधित रस्ता जुना हायवेशी जोडला गेला तर वाहतुकीस पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.

७) MIDC साठी जोड रस्त्यांचे जाळे उभारणे
चाकण MIDC परिसराकडे जाण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग असून सदुंबरे, इंदोरी, माळवाडी, तळेगाव, वडगाव, कान्हाफाटा, जांभूळ या मार्गांनी MIDC शी जोडणी शक्य आहे. नियोजन करून हे मार्ग खुले करणे आवश्यक आहे.

Talegaon Dabhade:श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

या सर्व उपाययोजना प्रशासनास ठाऊक असूनही नवीन कामाची अनास्था, टाळाटाळ आणि दुर्लक्ष या समस्या अधिक तीव्र करतात. एकत्रित बैठक घेऊन, नकाशे व दस्तऐवजांसह अधिकाऱ्यांशी समन्वय साधल्यास ही समस्या सोडवणे अशक्य नाही, असे सैंदाणे यांनी सांगितले.

मावळमित्र जनआंदोलन समितीचे प्रमुख सुशील सैंदाणे यांनी हे निवेदन अनुभव आणि स्थानिक अभ्यासाच्या आधारे जबाबदारीने सादर केल्याचे शेवटी नमूद केले आहे.

Follow Us On