मावळ ऑनलाईन –लोहगड किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाचे स्थान मिळाल्यामुळे शिवप्रेमी मध्ये खूप आनंदाचे वातावरण झाले. त्यामुळे लोहगड किल्ल्यावरती आज मोठ्या संख्येने शिवप्रेमी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ मंडळी ही सगळी जमा झाली.
लोहगड पायथ्यावरील शिवस्मारकावरील शिवमुर्तीला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. फटाकाच्या आतषबाजीत , वाजंत्री च्या गजरात, मिरवणुकीने सर्व शिवप्रेमी अधिकारी लोहगड पायथ्याला गेले. त्या ठिकाणी साखर वाटप, लाडू वाटप झाले सर्वांचे तोंड गोड केले. महिलांनी रांगोळ्या काढल्या,सर्वांनी या ठिकाणी आनंद व्यक्त केला व गड संवर्धन चांगल्या पद्धतीने व्हावा अशी आशा व्यक्त केली.
Vadgaon BJP : वडगांव मावळमधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव भाजपाची मागणी
Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित राज्य परिषद सदस्यांचा सत्कार; शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटेंनी केले अभिनंदन
केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन, पुरातत्व विभाग, यांचे अभिनंदन करण्यात आले. लोहगड संवर्धनाचे काम गेले पंचवीस वर्षे लोहगड विसापूर विकास मंच करत आहे. त्यामुळे मंचाच्या कार्यकर्त्यांच्या आनंद आज गगनात मावत नव्हता. आजच्या कार्यक्रमाला प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, पुरातत्व विभागाचे महाराष्ट्राचे सचिव विलास वाहने, पुरातत्व अधिकारी गजानन मुंडावरे, बजरंग येलेकर, सचिन टेकवडे ,संदीप गाडे, विश्वास दौंडकर,सरपंच सोनालि ताई बैकर, अलकाताई धानिवले, गणेश धानिवले, श्रमिक गोजममुंडे समस्त ग्रामस्थ, मंचाचे कार्यकर्ते, बजरंग दल कार्यकर्ते, सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, मोठ्या संख्येने हजर होते.
