मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – आषाढ – कृष्णपक्ष. तिथी – २. शके १९४७. वार – शनिवार. तारीख – १२.०७.२०२५ (Rashi Bhavishya 12 July 2025)
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी ०९..०० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – उत्तराशाढा ०६.३६ पर्यंत नंतर श्रवण. चंद्र राशी – मकर.
मेष- (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 12 July 2025
कार्यक्षेत्रात मानसन्मानात वृद्धी होईल. अधिकार योग चालून येतील. आज फक्त कर्तव्याला प्राधान्य देणे गरजेचे. मित्रमंडळींच्या फार नादी लागू नका.
वृषभ (शुभ रंग- पिस्ता)
नोकरदारांवर वरिष्ठांचे दडपण राहील. आज शासकीय नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. परिश्रम वाढवावे लागतील. आज दानधर्म कराल.
मिथुन (शुभ रंग – क्रीम)
उद्योग धंद्याच्या दृष्टीने आज विरोधी दिवस असून नोकरदारांना वरिष्ठाच्या पुढे नमते घ्यावेच लागेल. आज हातचे सोडून पळत्या मागे जाऊ नका.
कर्क ( शुभ रंग- केशरी)
नोकरीच्या ठिकाणी विरोधकांशी गोड बोलूनच आपला कार्यभाग साधावा लागेल नोकरदारांनी कामातील चुका टाळाव्यात. वैवाहिक जीवनात आज दोघात तिसरा येऊ देऊ नका.
Lohgad Fort : किल्ले लोहगडचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश
सिंह ( शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 12 July 2025
आज देण्या घेण्याच्या व्यवहारात सतर्क रहा. भावनेच्या भरात कोणालाही कसला शब्द देऊ नका. एखाद्या विश्वासू मित्राकडूनच तुम्हाला दगा फटका होऊ शकतो.
कन्या (शुभ रंग- गुलाबी)
आज अति आक्रमकता नुकसानाला कारणीभूत होईल. महत्त्वाच्या प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौस मौज करताना कायद्याचे भान असूद्या.
तूळ (शुभ रंग- जांभळा)
तरुणांच्या मध्ये चैनी व विलासी वृत्ती बळावेल. मॉलमधील ब्रँडेड वस्तू गृहिणींना आकर्षित करतील. कलावंत आज मिळालेल्या संधीचे सोने करतील.
वृश्चिक ( शुभ रंग- भगवा)
मुले आज मान मोडून अभ्यास करतील. घरात सज्जनांची येजा राहील. गृहिणींना लघु उद्योगातून चांगली मिळकत होईल. आज आईचे मन मोडू नका.
Mahesh Landge:धर्मांतराचा मुद्दा: हिंदू मुलींवर अत्याचार झाला त्यावेळी का नाही बोलला?
धनु (शुभ रंग- मोतिया) Rashi Bhavishya 12 July 2025
आज राशीच्या द्वितीय स्थानातून चंद्रभ्रमण होत असताना चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. लहान भावाला मदत करा. घराबाहेर वादविवाद टाळा.
मकर (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
विविध मार्गाने पैसा येईल आज आपले आवडते छंद जपण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल विवाह विषयक बोलणी करण्यासाठी आज उत्तम दिवस आहे.
कुंभ ( शुभ रंग- चंदेरी)
महत्त्वाच्या कागदपत्रांची तसेच मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या काही दूरचे नातलग संपर्कात येतील कलाकारांचा प्रदेशात नावलौकिक होईल.
मीन ( शुभ रंग – आकाशी)
खर्च कितीही वाढला तरी पैसे कमी पडणार नाहीत. तुमची मोठ्या लोकांमधील बस फायदेशीर राहील. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात असेल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424