मावळ ऑनलाईन – तळेगाव बाजार पेठेतील किड्स वर्ल्ड नर्सरी आणि प्ले ग्रुप या संस्थेने यंदाही सालाबाद प्रमाणे चिमुकल्यांची विठ्ठलवारी अत्यंत आनंदात आणि उत्साहात पार पाडली. गेली १४ वर्षे ही परंपरा अखंड सुरू असून, वारंवारतेने (Talegaon Dabhade)साजरा होणारा हा उपक्रम स्थानिकांचे लक्ष वेधून घेतो आहे.
Golden Rotary Trust : गोल्डन रोटरी ट्रस्टच्या अध्यक्षपदी किरण ओसवाल तर सचिवपदी राकेश गरुड
ही विठ्ठलवारी बाजार पेठेतून सुरू होऊन शाळा चौकातील विठ्ठल मंदिरात समाप्त होते. यावेळी सर्व धर्मीय बालकांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या. कोणी विठ्ठल-रुक्मिणीच्या पोशाखात होते, तर कोणी वारकरी वेशात. हातात टाळ, मुखात विठ्ठलनामाचा गजर आणि चेहऱ्यावर भक्तिभाव असलेल्या या लहानग्यांनी परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण (Talegaon Dabhade) केले.
SPG International Public School : एस.पी.जी. इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
या वारीचे खास आकर्षण म्हणजे अतिशय सुंदर सजवलेली लहानशी पालखी, जी या चिमुकल्यांच्या हातांनी विठ्ठल मंदिरापर्यंत नेण्यात आली. मंदिरात पोहोचल्यानंतर भजन, गाणी आणि लयबद्ध गजराच्या माध्यमातून समारोपाचा कार्यक्रम (Talegaon Dabhade) रंगला.
या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन स्वाती शहा यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेच्या माध्यमातून सर्व धर्मीय सण-उत्सवांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यामुळे तळेगावातील किड्स वर्ल्ड नर्सरी आणि प्ले ग्रुप ही शाळा केवळ शिक्षणापुरती मर्यादित न राहता सामाजिक, सांस्कृतिक व मूल्याधारित शिक्षणाची मुहूर्तमेढ ठरली आहे.
या शाळेची आणखी एक विशेषता म्हणजे तळेगावात सर्वप्रथम चिमुकल्यांसाठी डिजिटल शिक्षणाची सुरुवात याच शाळेने केली होती. त्यामुळे बाजार पेठेतील ही शाळा ‘आधुनिकतेची जाण ठेवणारी परंपराग्राही शाळा’ म्हणून ओळखली (Talegaon Dabhade) जाते.