मावळ ऑनलाईन – रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्षपदी किरण ओसवाल यांची निवड एक मताने करण्यात आली ( Golden Rotary Trust )आहे. उपाध्यक्षपदी डॉक्टर धनश्री काळे,सचिव पदी राकेश गरूड, खजिनदार पदी हर्षल पंडित यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
किरण ओसवाल रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष असून जैन सोशल ग्रुपचे संस्थापक, तळेगाव स्टेशन जनरल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष,तळेगाव जेसीजचे माजी अध्यक्ष,रुग्ण कल्याण समितीचे सदस्य असून अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आहे.
विविध कंपन्यांच्या सी एस आर फंडामधून तळेगाव शहरांमध्ये विविध समाज उपयोगी कामांच्या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे अध्यक्ष किरण ओसवाल,दीपक फल्ले,संतोष परदेशी यांनी सांगितले आहे.
राकेश गरुड हे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असून सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांची निवड करण्यात आली ( Golden Rotary Trust ) आहे.
डॉक्टर धनश्री काळे या पिंपरी चिंचवड होमिओपॅथी कौन्सिलच्या माजी सेक्रेटरी आहेत तर हर्षल पंडित हे स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक आहेत. रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष संतोष परदेशी क्लब ट्रेनर दीपक फल्ले,उपाध्यक्ष प्रशांत ताये,सेक्रेटरी प्रदीप टेकवडे,चेतन पटवा,रितेश फाकटकर व विकी बेल्हेकर हे संचालक म्हणून काम पाहतील.
क्लब ट्रेनर दीपक फल्ले,रोटरी गोल्डनचे अध्यक्ष संतोष परदेशी,ट्रस्टचे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी संचालक मंडळाची निवड जाहीर ( Golden Rotary Trust ) केली.