situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala:लोणावळा एसटी बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम लवकरच सुरू होणार – प्रताप सरनाईक

Published On:

आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

मावळ ऑनलाईन – लोणावळा शहरातील एसटी बस स्थानकाची झालेली दुरवस्था आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी लोणावळा बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे विधानभवन, मुंबई येथील बैठकीत स्पष्ट केले.

या बैठकीत आमदार शेळके यांनी बस स्थानकाच्या सध्याच्या स्थितीची, प्रवाशांना होणाऱ्या अडचणींची आणि मूलभूत सुविधांच्या अभावाची सविस्तर माहिती मंत्र्यांसमोर मांडली. प्रवास करणाऱ्या नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत त्यांनी या प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

Maval: शॉर्टसर्कीटच्या आगीत दोघे गंभीर भाजले, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आमदार शेळके यांची मागणी लक्षपूर्वक ऐकून घेतली व सदर प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेस अंतिम टप्प्यात नेण्यात आले असल्याचे सांगून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले.

नूतनीकरण प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर राबविण्यात येणार आहे.
  • नव्या बस स्थानकात स्वच्छतागृहे, कॅफेटेरिया, हॉटेल, व्यावसायिक दुकाने, प्रतीक्षागृहे, प्रवासी माहिती केंद्र अशा आधुनिक सुविधा असतील.
  • प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सोयीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

आमदार सुनील शेळके यांनी यापूर्वीही अनेकदा या प्रकल्पासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला असून त्यांनी स्पष्ट सांगितले की, “मावळच्या जनतेसाठी सोयी-सुविधा निर्माण करणे हे माझे कर्तव्य असून या प्रकल्पाची वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवले जाईल.”

या निर्णयामुळे लोणावळा येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून स्थानकाचा चेहरामोहराच बदलणार असल्याने लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Follow Us On