मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील गहुंजे गावातील डॉ. मीनल रमाकांत बोडके-साळुंखे यांना सॅटेलाइट सिक्युरिटी इमेजिंग या अत्यंत क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या विषयात पीएचडी मिळाली. त्यांनी ही पदवी डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई येथून प्राप्त केली असून, त्यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू “डिजिटल वॉटरमार्किंग” तंत्रज्ञान हा होता.
हे तंत्रज्ञान उपग्रह चित्रांमध्ये माहिती सुरक्षितरीत्या एम्बेड करण्यासाठी वापरलं जातं, जे त्या प्रतिमांच्या सुरक्षा, प्रामाणिकता व अखंडतेसाठी अत्यावश्यक आहे. त्यांच्या अभ्यासात ॲडव्हान्सड इन्क्रिप्शन स्टॅंडर्ड (एईएस)चा वापर करून प्रतिमांच्या एन्क्रिप्शन व डिक्रिप्शनचा वेळ कमी करणं, भौमितिक विकृती विरोधात प्रभावी वॉटरमार्किंग अल्गोरिदम तयार करणं, हायब्रीड वॉटरमार्किंग स्कीम्स चा वापर करून सुरक्षिततेत वाढ करणं अशा अनेक तांत्रिक बाबींवर काम करण्यात आले.
Mahavitran : संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज
Pavana Dam : पवना व आंद्रा धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ,पवना 77 टक्के तर आंद्रा 92 टक्के
डॉ. मीनल यांचे शिक्षण 1 ली ते 10 वी लायन्स क्लब शाळा, देहूरोड येथे झाले. त्यांनंतर त्यांनी पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक मधून आयटी मध्ये डिप्लोमा आणि पिंपरी-चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेज, आकुर्डी येथून बीई आणि एमई पूर्ण केले. या प्रवासात त्यांना अनेक अडचणी आल्या, पण कधीही हार न मानता, अभ्यासात सातत्य ठेऊन त्यांनी त्यांचे ध्येय गाठले. त्यांचे वडील खासगी कंपनीत नोकरी करतात. आई गृहिणी आहे. लहान बहिण सीएस पदावर कार्यरत आहे. यांच्यासह पती आणि मुलगी सानू यांचा त्यांच्या यशात वाटा आहे.
डॉ. मीनल बोडके-साळुंखे म्हणाल्या, “प्रत्येक अडथळा आणि अंधार आपल्याला काहीतरी शिकवतो. चिकाटी ठेवली, तर यश नक्की मिळतं.” डॉ. मीनल बोडके यांच्या यशामुळे गहुंजे गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. ग्रामीण भागातून आलेल्या एका साध्या मुलीने अशी मोठी शैक्षणिक झेप घेतल्यामुळे, ती नवतरुणींना एक दिशा आणि प्रेरणा देणारी आहे.