मावळ ऑनलाईन – देहूरोड परिसरातील गांधीनगर भागात मटका जुगार खेळत असलेल्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकत सहा आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून सहा हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला (Dehuroad Crime News) आहे. ही कारवाई सोमवारी (७ जुलै) दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी रमजान मोहम्मद हानिफ शेख (५२, निगडी), शशिकांत सुभाष मोरे (४३, मोहननगर), अनिल छगन अक्कर (७२), प्रेमदास दौलत चितारे (७२), सुरज बापू साथाळे (३६), लक्ष्मण राम कोथेम्मुला (६५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल पंकज भदाने यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (Dehuroad Crime News) आहे.
Pimpri Chinchwad Crime News 08 July 2025 : रासे येथे दारूभट्टीवर छापा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मटका जुगाराचे आकडे लिहून घेऊन पैसे खेळवताना आढळून आले. ते मुंबई कल्याण मटका नावाचा मटका खेळत होते. याबाबत माहिती मिळाली असता देहूरोड पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा हजार ७२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला (Dehuroad Crime News) आहे.