मावळ ऑनलाईन – शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशन, तळेगाव दाभाडे यांच्या वतीने लीड अप इंटरनॅशनल प्री-स्कूलमध्ये वन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत “One Child – One Plant” संकल्पनेतून पालकांना 251 रोपवृक्ष भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन फाउंडेशनच्या संचालिका मिनाक्षी शेलार आणि श्रीमती लिपिका शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पालकांशी संवाद साधत वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद केले.
मिनाक्षी शेलार म्हणाल्या, “ग्लोबल वॉर्मिंगसारख्या संकटांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण अत्यंत आवश्यक आहे. संत तुकाराम महाराजांचे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ आणि संत नामदेवांचे ‘जैसा वृक्ष नेणे या’ हे अभंग आजही प्रेरणादायी आहेत. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.”
Dehugaon: प्रलंबीत मागण्यासाठी देहू ते आळंदी दिव्यांगांनी काढली दुचाकी रॅली

लिपिका शेलार यांनी सांगितले, “वृक्ष संवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांचे संगोपन करतो, त्याचप्रमाणे झाडांचेही करणे आवश्यक आहे. प्रत्येक घरात तुळस, गवती चहा, अडुळसा, ओवा, आंबेमोहोर यांसारख्या औषधी वनस्पती असाव्यात. या वनस्पती घरगुती उपचारांसाठी उपयुक्त ठरतात आणि आपल्या पूर्वजांनी यालाच आरोग्याचे गमक मानले होते.”
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यालयाच्या प्राचार्या अश्विनी भट यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. पूनम जाधव, शुभांगी भोसले, विद्या देशमुख, तन्वी शेवकर आणि वंदना पासवान यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.
PCMC:हिंजवडीसह सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याच्या मागणीबाबत कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
या उपक्रमाने पालकांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण होऊन समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे.