situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Adarsh ​​Vidya Mandir: आदर्श विद्यामंदिर मध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात संपन्न

Published On:

मावळ ऑनलाईन –आदर्श विद्यामंदिर मध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात अभंगाच्या सुरात आषाढी एकादशीचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी अभंगाद्वारे विठू माऊलीची आराधना केली. प्रथमतः पालखीचे पूजन मावळ शिक्षण संस्थेचे सहसचिव वसंत पवार व शाळेचे मुख्याध्यापक संतोष खामकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पांडुरंगाची आरती झाली. विठू माऊली तू माऊली जगाची देव माझा विठू सावळा या अभंग रचनेतून विद्यार्थ्यांनी साक्षात विठ्ठलाचे दर्शन घडवले .इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी रिंगण करून विठुरायाचा जयघोष केला.

डोक्यावर तुळशीचे रोप घेऊन पर्यावरणाचा संदेश या विद्यार्थ्यांनी यानिमित्त दिला. इयत्ता सहावीतील कुमारी सौम्या अलबते या विद्यार्थिनीने आषाढी एकादशीचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. इयत्ता सहावी व सातवीतील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने तालावर विठू माऊलीचा जयघोष केला. इयत्ता

पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांची दिंडी विठूचा गजर करत काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने पांडुरंगाचे आणि पंढरीचे दर्शन घडवले अशा शब्दात सहसचिव श्री वसंत पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .आज हजारो वारकरी पायी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतात परमेश्वराच्या नामस्मरणात किती शक्ती आहे हे आपल्याला वारकऱ्यांच्या पायी प्रवासाने कळते कारण ते न दमता पांडुरंगाच्या भेटीला जातात हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

परमेश्वर हा भक्तीचा भुकेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी निस्वार्थपणे भक्ती करून प्रामाणिक प्रयत्न करून सत्याचा मार्ग स्वीकारायला हवा असे मोलाचे मार्गदर्शन माननीय श्री वसंत पवार यांनी केले. शेवटी प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ प्रतीक्षा ढवळे यांनी केले. लेझीम पथक तयारी सहशिक्षिका सौ राजश्री कसबे व सौ प्रियंका पवार यांनी केली.

Alandi :देवशयनी आषाढी एकादशी निमित्त माऊली मंदिरात भाविकांची गर्दी

Pavana Dam : पवना धरणात दमदार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ – साठा 71 % वर

अभंग तयारी सहशिक्षिका सौ सुजाता डावखरे यांनी करून घेतली .कार्यक्रमाचे नियोजन दिनविशेष प्रमुख सौ स्वाती शिंदे व सौ अर्चना आपटीकर यांनी माननीय मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार केले. आषाढी एकादशीनिमित्त मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Follow Us On