मावळ ऑनलाईन – पवनानगर ते कामशेत मार्गावरील अरुंद आणि अतिक्रमणग्रस्त रस्त्यांमुळे अपघातांच्या घटना वाढत असून, शुक्रवारी येळसे आणि कडधे (Pavananagar Accident ) गावांच्या हद्दीत मालमोटार अपघातग्रस्त झाली. दोन मालवाहतूक गाड्या समोरासमोर येताच, एक गाडी रस्त्याच्या कडेला घसरून उलटली. या घटनेत चालक जखमी झाला असून, या ठिकाणी दिवसभर वाहतूककोंडी झाली होती.
Kondhwa rape case : कोंढवा बलात्कार प्रकरणाला नवे वळण, पीडितेलाच घेतले पोलिसांनी ताब्यात
पवनानगर परिसरातील अनेक भागांत रस्त्यांचे डांबरीकरण झाले असले तरी, करुंज, कडधे, येळसे आणि पवनानगर परिसरात रस्त्यांच्या कडेला टपऱ्या व अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी वाहनांची ये-जा करताना अपघात होण्याचा धोका वाढला आहे. अपघाताचे हेच कारण शुक्रवारी घडलेल्या घटनेत अधोरेखित झाले.
या मार्गावर यापूर्वीदेखील बोरघाटात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याची घटना घडली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी डागडुजी केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे.
कामशेत-पवनानगर मार्गावर दिशादर्शक फलकांचा अभाव असून, राजकीय पक्षांचे आणि व्यावसायिकांचे जाहिरात फलक मात्र ठिकठिकाणी दिसून येतात. त्यामुळे प्रशासनाने या रस्त्याच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज (Pavananagar Accident ) आहे.