मावळ ऑनलाईन – मावळातील ठाकरसाई येथे एका बंगल्यावर माळीकाम करणाऱ्या सहकाऱ्याचा डोक्यात कुदळ घालून खून करण्यात आला (Murder) आहे. ही घटना गुरुवारी (दि.3)पहाटे घडली.
Pune Crime News : पुणे तिथे काय उणे, कारवाई होणारा ही मद्यधुंद आणि कारवाई करणारा ही मद्यधुंद
दिनेश लक्ष्मण गरवड (वय 36 रा. भाजे, मावळ) असे मयत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर गरवड (वय 40 रा. भाजे, मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून प्रणव विश्वजीत डेका (वय 18 रा.वडगाव मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Water Closure Notice : तांत्रिक बिघाडामुळे तळेगाव दाभाडे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व मयत गरवड हे दोघे ठाकर साई येथील कुबेर व्हिला बंगल्याच्या देखरेखीचे काम करत होते. दोघांंनीही कामावर असताना दारू प्यायली. यावेळी गरवड याने आरोपीला आई वरून शिवीगाळ केली. याचा राग मनात धरून प्रणव डाके याने गरवड याच्या डोक्यात कुदळ घालून खून केला. यावरून लोणावळा ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Murder) आहेत.