मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – आषाढ – शुक्लपक्ष. तिथी – ९ (१६.३२ पर्यंत) शके १९४७. वार – शुक्रवार. तारीख – ०४.०७.२०२५ (Rashi Bhavishya 4 July 2025)
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – चित्रा १६.५० पर्यंत नंतर स्वाती. चंद्र राशी – तुळ.
मेष- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 4 July 2025
आज समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. इतरांना तुम्ही योग्य सल्ले देऊ शकाल. घरगुती प्रश्नात मात्र पत्नीचा सल्ला हिताचा राहील.
वृषभ (शुभ रंग- राखाडी)
आज तुमची तब्येत जरा नरमच असेल. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल. आज तुम्हाला विश्रांतीची गरज भासेल. काही येणी वसूल होतील.
मिथुन (शुभ रंग – मरून)
प्रचंड कामाच्या व्यापातून सुद्धा आज तुम्ही परिवारासाठी वेळ काढाल. एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. आज मुलांचे लाड हौशीने पुरवाल.
कर्क ( शुभ रंग- गुलाबी)
काही जणांना नव्या घर खरेदीचे वेध लागतील. वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होऊ शकते. मुलांची अभ्यासातील गोडी वाढेल. आज रुग्णांना आराम पडेल.
Krishnarao Bhegde : सर्वसामान्यांच्या प्रश्नावर भूमिका घेणारा लढवय्या मावळा हरपला – शरद पवार
सिंह ( शुभ रंग- भगवा) Rashi Bhavishya 4 July 2025
तुमच्या कार्यक्षेत्रात विविध मार्गाने चालून असलेल्या संधींचा वेळीच लाभ घ्या. काही योग्य व्यक्ती संपर्कात येतील. अनुभवींचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.
कन्या (शुभ रंग- डाळिंबी)
कौटुंबिक सदस्यांमधील सुसंवाद तुमच्या कामातील उत्साह वाढवेल. आज तुम्ही एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये सहकुटुंब जेवणाचा आस्वाद घ्याल.
तूळ (शुभ रंग- जांभळा)
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. आज एखादी हरवलेली वस्तू सापडेल. वैवाहिक जीवनात आज तू तिथे मी.
वृश्चिक ( शुभ रंग- मोतिया)
घरात वडीलधाऱ्या माणसांशी क्षुल्लक कारणाने वाद होतील. गृहिणींची खरेदीत फसवणूक संभवते. आज मोठे आर्थिक व्यवहार टाळलेले बरे.
धनु (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 4 July 2025
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील. उपवारांना स्थळे सांगून येतील. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात आजचा दिवस मजेत जाईल.
मकर (शुभ रंग- पांढरा)
नोकरदारांवर वरिष्ठांचे दडपण राहील. ध्येयपूर्तीसाठी मेहनत वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आज शासकीय नियम काटेकोरपणे पाळावे लागतील.
कुंभ ( शुभ रंग- क्रीम)
उद्योग-धंद्याच्या दृष्टीने आज विरोधी दिवस असून नोकरदारांना साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. आज हातचे सोडून पळत्यामागे जाण्याचा मोह टाळा.
मीन ( शुभ रंग – पिस्ता)
आज विश्वासू माणसाकडूनच विश्वासघात होऊ शकतो. गृहिणींना आज विविध जाहिराती भुरळ घालतील. प्रलोभराच्या आहारी जाऊ नका. सतर्क रहा.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424