मावळ ऑनलाईन – सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेणारा लढवय्या मावळा हरपला त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत आहे अशा (Krishnarao Bhegde) शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मावळ भूषण, शिक्षण महर्षी, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन सोमवारी(दि३०) झाले. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी तळेगाव येथील त्यांच्या निवासस्थानी पवार हे स्वतः व त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार हे दोन्ही उभयंता आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेवेळी काँग्रेस मधून बाहेर पडताना आपला जिवलग व सच्चा समर्थक म्हणून कृष्णराव भेगडे यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय केला होता. अशा सच्च्या कार्यकर्त्याला आपण मुकलो असल्याचे दुःख सहन होत नाही. असे भावनावश होत त्यांनी कै भेगडे यांची कन्या राजश्री म्हस्के व जावई राजेश म्हस्के तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले व धीर (Krishnarao Bhegde) दिला.
Lonavala Rain : लोणावळ्यात जोरदार पावसाची हजेरी; २४ तासांत १६५ मिमी पावसाची नोंद, नदी-नाल्यांना पूर
यावेळी माजी मंत्री मदन बाफना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब भेगडे,कै भेगडे यांचे पुतणे उद्योजक आनंद दादा भेगडे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार, पुणे पीपल्स को-ऑप बँकेचे संचालक बबनराव भेगडे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, संदीप काकडे, विश्वनाथ वाजे आदीजण उपस्थित होते.
शरद पवार आणि माजी आमदार कृष्णराव भेगडे हे एकमेकांचे जिवलग मित्र होते शरद पवारांनी आणि त्यांच्या विधायक भूमिकांना आमदार भेगडे हे सदैव पाठिंबा आणि पाठबळ देत होते. पुणे जिल्ह्यात आणि राज्यात शरद पवार यांची भूमिका अतिशय परखडपणे मांडणारे आणि परखडपणे पक्षाचे काम करणारे धुरंधर व निष्ठावंत म्हणून त्यांचा लौकिक होता. तसेच सल्लागार म्हणूनही आपली भूमिका ते बजावत असत. वेळोवेळी शरद पवार यांना अडचणी यायच्या, राजकीय संकटे यायची अशावेळी कृष्णराव भेगडे हे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असे.
कृष्णराव भेगडे यांचे समाजोपयोगी काम अखंडपणे चालू ठेवा ही त्यांना श्रद्धांजली ठरेल असे विचार श्री पवार यांनी यावेळी व्यक्त केले.कै भेगडे यांच्या निधनानंतर श्री पवार हे त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी सहपरिवार पुणे येथून आले होते.निवासस्थानी पोहोचल्यावर प्रथम श्री पवार यांनी कै भेगडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच कुटुंबीयांकडून त्यांच्या आजारपणा बाबत माहिती (Krishnarao Bhegde) घेतली.