मावळ ऑनलाईन – मुंबई पुणे हायवे शितल हॉटेल समोर वडगाव फाटा येथे आज (गुरुवारी) सायंकाळी 6 च्या सुमारास इर्टीका (MH42BB4465) कारला आग लागली होती. ही गाडी पुण्याच्या दिशेने जात होती. घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे तसेच तळेगाव एमआयडीसी अग्निशमनदल घटनास्थळी दाखल झाले होते. आग एवढी भीषण होती की यात गाडी पुर्ण जळून खाक झाली.सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.
PMRDA : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता खुला करण्यास पीएमआरडीएकडून प्रारंभ
आग पुर्णपणे विझवली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या होत्या. हळू हळू वाहतूक कोंडी सुटत असून वाहतूक पुर्वपदावर येत आहे.लिडिंग फायरमन ताहिर मोमीन, वाहनचालक समीर दंडेल, प्रदिप तुमकर,विनोद ढोरे,अग्निशमन दल वडगाव नगरपंचायत मावळ, तसेच रियाज मुलाणी,धिरज शिंदे अग्निशमन दल तळेगाव दाभाडे या वाहनांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली तसेच वडगाव पोलिस स्टेशन ठाणे अंमलदार खोपडे व होले, कान्सॅटेबल राक्षे यांच्या साहाय्याने ट्राफिक कोंडी नियंत्रण मध्ये आणले.ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

Maval : “यश दिशा २०२५ ” मार्गदर्शन परिसंवादास नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये उस्फुर्त प्रतिसाद
ही गाडी बारामतीची असल्याची माहिती समोर येत आहे. या वेळी वन्यजीव रक्षक मावळ संस्था आपदा मित्र मावळ यांच्या जिगर सोळंकी, शत्रुघ्न रासनकर, सर्जेस पाटिल,भास्कर माळी , मयूर चौधरी यांनी बचाव कार्यात सहकार्य केले.