मावळ ऑनलाईन – लोणावळा शहरात बुधवारी (२ जुलै) मुसळधार पावसाचा (Lonavala Rain) जोर राहिला. गेल्या २४ तासांत तब्बल १६५ मिमी (६.५० इंच) पावसाची नोंद शहरात झाली असून, यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. जून महिन्यापासून सुरू झालेला पावसाचा जोर अद्यापही कायम असून, गुरुवारी (३ जुलै) सकाळपासूनही पावसाची संततधार सुरू आहे.
बुधवारी सकाळी पावसाचा जोर सौम्य होता. मात्र, दुपारनंतर आकाश काळवंडले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. हवामान खात्याच्या माहितीनुसार, यावर्षी आजअखेरपर्यंत लोणावळा शहरात एकूण २२२६ मिमी (८७.६४ इंच) पावसाची नोंद (Lonavala Rain) झाली आहे. ही मात्रा दरवर्षी होणाऱ्या सरासरीच्या निम्म्या पावसाच्या जवळपास पोहोचली आहे, ज्यामुळे यंदाचा पावसाळा समाधानकारक असल्याचे स्पष्ट होत आहे.
Pimpri Chinchwad: परिवहन विभागाच्या जाचक अटींचा भुर्दंड प्रवासी वाहतूकदारांना नको – दत्तात्रय भेगडे
पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांची गैरसोय झाली आहे. विशेषतः लोणावळा बसस्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ, भुशी डॅम रस्ता व कुसगाव चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. इंद्रायणी नदीपात्रातही पाण्याची पातळी वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शहरातील वाकसई, सदापूर, कार्ला व मळवली भागांमध्ये ओढे-नाले तुडुंब (Lonavala Rain) भरून वाहत असून, काही भागांत शेतजमीन पूर्णतः पाण्याखाली गेली आहे. विशेषतः भातशेतीवर याचा परिणाम झाला असून, काही ठिकाणी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Pavana Dam : पवना धरण ६६ टक्क्यांहून अधिक भरलं; गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा चारपट
दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, पावसाचे प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.