मावळ ऑनलाईन – शिवसेना (ठाकरे गट)चे राज्यसभा खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावरील गंभीर आरोपांकडे लक्ष वेधले आहे. संबंधित प्रकरणात कारवाई करण्याची विनंती त्यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.
राऊत यांनी (MP Sanjay Raut) पत्रात नमूद केले आहे की, “मावळ मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांच्याशी संबंधित उत्खनन प्रकरणांमध्ये राज्य सरकारच्या हजारो कोटी रुपये महसुलाचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. एमआयडीसीच्या काही जमिनींवर खाण उद्योग चालवण्यात आला असून त्यासंबंधी सविस्तर माहिती आणि काही कागदपत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवली आहेत.”
तसेच, यापूर्वीही त्यांनी विविध मंत्र्यांविरोधात काही प्रकरणांची माहिती सरकारकडे पाठवली होती, मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
PCMC :विद्यार्थ्यांना मोफत बसपास योजना -स्थायी समिती सभेत मान्यता
दरम्यान, आमदार सुनील शेळके यांनी या आरोपांवर (MP Sanjay Raut) प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, “माझ्याविरोधात कोणतीही अधिकृत चौकशी सुरू नाही किंवा कोणतेही शासकीय नोटिसा आलेल्या नाहीत. सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. जर काही पुरावे संजय राऊत यांच्याकडे असतील, तर ते त्यांनी १५ दिवसांत सादर करावेत. तोपर्यंत मी या प्रकरणावर कोणताही खुलासा करणार नाही.”