मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – आषाढ – शुक्लपक्ष. तिथी – ८ (१४.७ पर्यंत) शके १९४७. वार – गुरुवार. तारीख – ०३.०७.२०२५ (Rashi Bhavishya 3 July 2025). शुभाशुभ विचार – उत्तम दिवस. आज विशेष – दुर्गाष्टमी. राहू काळ – दुपारी ०१.३० ते ३.००. दिशा शूल – दक्षिणेस असेल. आज नक्षत्र – हस्त १३.५१ पर्यंत नंतर चित्रा. चंद्र राशी – कन्या.
मेष- (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 3 July 2025
कार्यक्षेत्रात ध्येय प्राप्तीसाठी मेहनत वाढवायला हवी. आज कुणालाही काही सल्ले न देता फक्त स्वार्थ साधून घेण्यास प्राधान्य द्या. आज प्रयत्नांती परमेश्वर.
वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुमच्यासाठी उत्साह पूर्ण दिवस आहे. सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. आज एखादा नवीन विषय शिकून घेण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.
मिथुन (शुभ रंग – गुलाबी)
आज तुम्ही कुटुंबीयांना तुमचा जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थी आज पालकांची अपेक्षा पूर्ण करतील. नवोदित कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.
कर्क ( शुभ रंग- मरून)
आज मोफत सल्लागार मंडळी बरीच भेटणार आहेत. ऐकाल जनाचे पण कराल आपल्या मनाचे. प्रवासात काही नवी नाती जुळून येतील. शेजारी सलोखा वाढेल.
Lonavala: लोणावळा परिसरात मंदिरातील चोरी प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर
सिंह ( शुभ रंग- डाळिंबी) Rashi Bhavishya 3 July 2025
आर्थिक आवक मुबलक असेल. आज विरोधकही मैत्रीसाठी हात पुढे करतील. आज काही नाती गोड बोलूनच जपावी लागतील. शब्द जपून वापरा.
कन्या (शुभ रंग- भगवा)
तुमचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. आज तुम्ही इतरांच्या भांडणात यशस्वी मध्यस्थी कराल. आज वैवाहिक जीवनातली लज्जत वाढणार आहे.
तूळ (शुभ रंग- मोतिया)
आज दिवस खर्चाचा असताना बिनधास्त खर्च करा. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. तरुण मंडळी मॉलमधील ब्रँडेड वस्तूंची खरेदी करतील.
वृश्चिक ( शुभ रंग- जांभळा)
आज दिवस लाभाचा असल्याने वाढत्या खर्चातही पैशाची उणीव भासणार नाही. आज आपला मोठेपणा जपण्यासाठी उदार मनाने तुम्ही खर्च कराल.
धनु (शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 3 July 2025
उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आज अनुकूल दिवस. नवीन व्यावसायिकांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. कार्यक्षेत्रात यशाची चढती कमान राहील.
मकर (शुभ रंग- आकाशी)
शासकीय कामात दिरंगाई होईल. अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यांना एखादी दिव्य प्रचिती येईल. श्रद्धाळू गृहिणींचा यथाशक्ती दानधर्म चालूच राहील. सामान्य दिवस.
कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)
आज व्यवसायात मर्यादेबाहेर आर्थिक उलाढाली टाळा. यंत्रावर कामे करणाऱ्यांनी आज आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. पत्नीचे सल्ले डावलू नका.
मीन ( शुभ रंग – निळा)
आज तुमचे मनोबल उत्तम असल्याने कार्यक्षेत्रातील आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. महत्त्वाचे निर्णय घेताना मात्र आज तुमची द्विधा मनस्थिती होऊ शकते.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424