मावळ ऑनलाईन – लोणावळा व आसपासच्या परिसरात जून महिन्यात मंदिरांमध्ये झालेल्या चोरी संदर्भात लोणावळा पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत.
जून महिन्यात लोणावळा परिसरातील जैन मंदिर, मारुती मंदिर, तुंगार्ली येथील जखमाता मंदिर येथे चोरीच्या घटना घडल्या आहेत.
या प्रकरणाला गांभीर्याने घेत लोणावळा पोलीस सध्या शहर व आसपासच्या परिसरातील धार्मिक स्थळांना स्वतः भेटीगाठी देत आहेत. यामध्ये मंदिर परिसराची पहाणी ,सीसीटीव्ही ची तपासणी ,मंदिर प्रशासनाला सूचना आदी गोष्टी पोलिस प्रशासन करत आहेत.
याविषयी माध्यमांना माहिती देताना लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ट पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे म्हणाले की, मंदिरातील दानपेटीतील पैसे चोरण्याचा जो प्रकार घडत आहे तो पुन्हा घडूनये असा आमचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी मी स्वतः मंदिर व इतर धार्मिक स्थळांना भेटी देत आहे.यात सीसीटीव्ही हे धार्मिकस्थळांनी अशा ठिकाणी लावावेत ज्याने सर्व परिसर कव्हर व्हावा तसेच ते हलाल नाही पाहिजे. ज्यामुळे चोर त्याच्याशी छेडछाड करणार नाहीत. तसेच आत्ता पर्यंत 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यातून काही हाती लागते का याचाही आम्ही तपास करत आहोत,असे ही रामघरे यांनी सांगितले.
जून महिन्यात 3 ते 4 धार्मिक स्थळांवर चोराने डल्ला मारला आहे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. नागरिकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी पोलीस ठाणा भेटीगाठी देऊन जनजागृती करत आहेत.