मावळ ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण (Pavana Dam) क्षेत्रात पावसाळ्याची चांगली सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, सध्या धरण ६३ टक्के भरले आहे.
बुधवार, २ जुलै २०२५ रोजीच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत पवना धरण परिसरात ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत एकूण ९२८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून यामुळे धरणाचा पाणीसाठा ६२.९१ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो सुमारे ६३ टक्के मानला जात आहे.
Gramin Patrakar Sangh : मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन ठाकर
विशेष म्हणजे, याच दिवशी मागील वर्षी म्हणजे २ जुलै २०२४ रोजी केवळ १८.१४ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा धरण (Pavana Dam) साठ्यात तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. १ जूनपासून आजअखेर साठ्यात ४३.१० टक्क्यांची भर पडली आहे, ही वाढ भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी दिलासादायक मानली जात आहे.
Pune : अधिकाऱ्यासाठी पाच हजारांची लाच घेताना खासगी रायटर महिलेला रंगेहात अटक
पवना धरण हे मावळातील एक महत्त्वाचे जलस्रोत असून, त्याद्वारे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह मावळातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. धरणाच्या पाणीसाठ्यात अशी वाढ झाल्यामुळे स्थानिक प्रशासन व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
धरण परिसरात (Pavana Dam) आणखी काही दिवस चांगला पाऊस सुरू राहिल्यास लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे.