मावळ ऑनलाईन – कान्हे फाटा ते टाकवे बुद्रूक या एमआयडीसी रोडवर महिंद्रा कंपनीसमोर एक ट्रेलर पलटी झाला आहे. हा अपघात आज (मंगळवारी) सांयकाळच्या सुमारास घडला आहे सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.
हा ट्रेलर लोखंडी क्वॉईल घेवून जात होता. रोडच्या साईडपट्ट्या खचल्याने वळत असताना हा अपघात झाला आहे. घटनास्थळी वडगाव मावळ पोलीस दाखल झाले आहेत. तळगाव एमआयडीसी येथून कान्हे एमआयडीसी येथे ट्रेलर सामान घेवून जात होता. यावेळी रस्त्यावरील खड्डे, साईट पट्ट्या, पार्कींग व्यवस्था आदी गोष्टींची दुरुस्ती करण्यात यावी अशी स्थानिकांनी मागणी केली आहे.