मावळ ऑनलाईन – किरकोळ कारणावरून एका व्यावसायिकाला व तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावरून कामशेत पोलीस ठाण्यात तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी 30 जून रोजी मध्यरात्री कामशेत येथील इंद्रायणी कॉलनी परिसरात घडली आहे.
याप्रकरणी सोमनाथ खंडू शिंदे वय 37 रा. कामशेत) यांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी श्रीधर हुले उदय हुले दोघे राहणार कामशेत व एक अनोळखी संग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे रात्री उशिरा एकत्र थांबले होते. यावेळी फिर्यादी यांनी त्यांना एवढ्या उशिरा येते का थांबला आहात असे हटकले याचा राग येऊन आरोपींनी हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी व त्यांचा मित्र रणधीर यादव यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी व त्यांचा मित्र हे दोघे गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी कुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. कामशेत पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.