मावळ ऑनलाईन – प्लास्टिक मुक्त तळेगाव दाभाडे शहरासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी केले तळेगाव दाभाडे नगर परिषद व रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अंतर्गत प्लास्टिक मुक्त तळेगाव दाभाडे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी माननीय मुख्याधिकारी बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्य अधिकारी ममता राठोड शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे सहप्रांतपाल दीपक फल्ले माजी अध्यक्ष किरण ओसवाल स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक हर्षल पंडित, माजी नगरसेवक अरुण माने,राकेश ओसवाल,विनोद राठोड हे उपस्थित होते.
Pimpri: मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकाचे ताबडतोब भूमिपूजन करा – प्रमोद क्षीरसागर

याप्रसंगी तळेगाव शहर वासियांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तळेगाव शहरातून प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करावा असे आवाहन गोल्डन रोटरीचे अध्यक्ष संतोष परदेशी यांनी केले तर ममता राठोड यांनी सर्व शालेय विद्यार्थी व नागरिकांना प्लास्टिक मुक्तीची शपथ दिली. शिल्पा रोडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्लास्टिकची कोणतीही पिशवी आपण आणू नये असे आवाहन केले व सर्व शाळांमधून आम्ही प्लास्टिक संकलन करू व ते संकलन आपण पुढे रिसायकल साठी देऊ असे आवाहन केले.
याप्रसंगी रोटरी समाज सेवा ग्रुपच्या आशा सेविका स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे सदस्य नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका व नागरिकांनी या जनजागृती रॅली उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.
या रॅलीमध्ये प्रत्येक चौकामध्ये नगरपालिका शाळेमधील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्ती वरची पथनाट्य सादर केले व सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या हातामध्ये प्लास्टिक मुक्ती बाबत विविध प्रकारचे घोषवाक्य घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांची घोषवाक्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे महात्मा गांधी व प्लास्टिकचा भस्मासुर राक्षस हे या रॅलीचे आकर्षण होते.
घोषवाक्य स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक सिद्धी रंजवे,संत ज्ञानेश्वर शाळा,नंबर ६, द्वितीय क्रमांक,समृद्धी शेंद्रे,उमाबाई दाभाडे शाळा,नंबर ४ व तृतीय क्रमांक,राहुल पुजारी,लोकमान्य टिळक शाळा,नंबर ३
यांनी पारितोषिके पटकावली.
टेक्नोवेस कंपनीच्या वतीने सहभागी सर्व विद्यार्थ्यांना निखिल महापात्रा यांच्यातर्फे प्रशस्तीपत्रक देण्यात आले. यावेळी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तळेगाव दाभाडे वाहतूक शाखा यांनी सुद्धा या रॅलीमध्ये सहभाग घेऊन तळेगाव शहराला प्लास्टिक मुक्त करण्याचे आवाहन केले.
कविता खोल्लम व ममता मेडिकल यांच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप तसेच ढमाले डेअरीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना सुगंधित दुधाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता खोल्लम यांनी आभार प्रदर्शन प्रदीप टेकवडे यांनी व सूत्रसंचालन प्रशांत ताये यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन निखिल महापात्र,दिनेश चिखले,बसप्पा भंडारी,प्रदीप मुंगसे, राकेश गरुड,डॉ धनश्री काळे, मेधा शिंदे,दीक्षा वाईकर,सुजाता देव,चेतन पटवा,गौरव क्षीरसागर, विजय गोपाळे,ललित देसले,समर्थ रेवणशेट्टे,अभिषेक पांडे,शुभम महाजन,कमलेश चौधरी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.