मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग – महिना – आषाढ – शुक्लपक्ष. तिथी – ५ (९.२४ पर्यंत)
वार – सोमवार. तारीख – ३०.०६.२०२५. (Rashi Bhavishya 30 June 2025)
शुभाशुभ विचार – १७ प.चांगला दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी ७.३० ते ०९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – मघा ७.२१ पर्यंत नंतर पूर्वा फाल्गुनि. चंद्र राशी – सिंह.
मेष- (शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 30 June 2025
स्टेशनरी सौंदर्यप्रसाधने इत्यादी व्यवसाय चांगले चालतील. नोकरीला कंटाळलेले नोकरदार एखाद्या धंद्याचे प्लॅनिंग करतील. आज तुम्ही यथाशक्ती चैन कराल.
वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)
तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धीच होईल. मुलांची अभ्यासातील कामगिरी समाधानकारक असेल. काहीजण आज नव्या वाहन खरेदीचा विचार करतील.
मिथुन (शुभ रंग – डाळिंब)
आज काही महत्त्वाचे समाचार येतील. क्षुल्लक गैरसमजामुळे दूर झालेली भावंडे एकत्र येतील. भाडेकरूंचे घर मालकांशी सौम्य मतभेद होऊ शकतात.
कर्क ( शुभ रंग- मरून)
आज राशीच्या धनस्थानात भ्रमण करणारा चंद्र तुमची आर्थिक बाजू भक्कम ठेवेल. शब्द हे शस्त्र आहे असे भान ठेवावे लागेल. अन्यथा काही नाती दुरावतील.
Boraj: बोरज गावात १२ फूट लांब अजगर आढळल्याने खळबळ; तात्काळ रेस्क्यू करून सोडला जंगलात
सिंह ( शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 30 June 2025
आज तुम्ही काहीसे हट्टेपणाने वागाल. तुम्हाला इतरांशी जमवून घेणे अवघड जाईल. आज वाद विवाद टाळावा. प्रत्येक निर्णय विचारांती घ्यायला हवा.
कन्या (शुभ रंग- क्रीम)
काही जणांना महत्त्वाच्या कामासाठी दुरसे प्रवास घडतील. बेरोजगारांची भटकंती चालूच राहील. आज कंजूषणा अजिबात उपयोगाचा नाही. खर्च करावाच लागणार आहे.
तूळ (शुभ रंग- जांभळा)
आज कार्यक्षेत्रात काही अनुकूल घटना तुमचे मनोबल वाढवतील. प्रतिष्ठितांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. मित्र तुमचा हेवा करतील.
वृश्चिक ( शुभ रंग- पांढरा)
आज व्यवसाय वृद्धीसाठी विविध संधी चालून येतील. कोणतेही नवे उपक्रम हाती घेण्यासाठी आज योग्य दिवस आहे. कोणत्याही क्षेत्रात अनुभवींचे मार्गदर्शन जरूर घ्यायला हवे.
Pune : मी ठरवलं होतं,बंगला बांधल्या शिवाय लग्न करायचं नाही -अजित पवार
धनु (शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 30 June 2025
नवीन व्यावसायिकांनी आज आळस झटकून कामाला लागणे गरजेचे आहे. भावी योजना इतक्यात उघड करू नयेत. स्पर्धकांना कमजोर समजू नका.
मकर (शुभ रंग- चंदेरी)
आज प्रतिकूल दिवस. कोणतेही धाडस टाळावे. कुणीही लढ म्हणाले म्हणून लढायला जाऊ नये. विवाह जुळवणे विषयी चर्चा आज तरी नको.
कुंभ ( शुभ रंग- क्रीम)
आज महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. तुमच्या वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव राहील. जोडीदाराला दिलेला शब्द पाळाल.
मीन ( शुभ रंग – मोतिया)
कार्यक्षेत्रात प्रामाणिक मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या मतांचा आदर करतील. आज संध्याकाळी थोडा थकवा जाणवेल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424