मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग महिना – आषाढ – शुक्लपक्ष.तिथी – ४.(९.१५ नंतर पंचमी).वार – रविवार. तारीख – २९.०६.२०२५. (Rashi Bhavishya 29 June 2025) शुभाशुभ विचार – ९ नंतर चांगला दिवस.आज विशेष – सामान्य दिवस.राहू काळ – सायंकाळी ४.३० ते ०६.००.दिशा शूल – पश्चिमेस असेल.आज नक्षत्र – आश्लेषा ६.३४ पर्यंत नंतर मघा.चंद्र राशी – कर्क ६.३४ पर्यंत नंतर सिंह.
—————————-
मेष- (शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 29 June 2025
उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे आज तुमचे धोरण असेल.
वृषभ (शुभ रंग- राखाडी)
पारिवारिक सदस्यांमध्ये सामंजस्याची भावना राहील. मुलांची अभ्यासातील गोडी वाढेल. आज गृह सौख्याचा दिवस. आईला दिलेला शब्द जरूर पाळा.
मिथुन (शुभ रंग – डाळिंबी)
राशीच्या तृतीय स्थानातून भ्रमण करणारा चंद्र तुमच्या पराक्रमात वृद्धी करणार आहे. आज तुम्ही चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य द्याल. भावंडांशी सलोखा वाढेल.
कर्क ( शुभ रंग- मोरपंखी)
आज अत्यंत उत्साहाने तुम्ही दिवसाची सुरुवात कराल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने मनोबलही उत्तम राहील. व्यवसायात काही पेच प्रसंगांना तुम्ही धैर्याने तोंड द्याल.
सिंह ( शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 29 June 2025
आज तुम्ही एखादा विवाह जुळविण्यात यशस्वी मध्यस्थी कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत ठामपणे मांडाल. आज घाई गर्दीत घेतलेले निर्णय मात्र चुकतील.
कन्या (शुभ रंग- लाल)
भविष्यकाळाच्या दृष्टीने एखादी गुंतवणूक करण्याचा तुमचा विचार राहील. ज्येष्ठ मंडळी तीर्थयात्रा करतील. घरातील थोर मंडळी आपलेच खरे करतील.
तूळ (शुभ रंग- आकाशी)
तुम्ही पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक तुम्हाला चांगला लाभ देईल. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेले कष्ट कारणी लागतील. नोकरदारांसाठी प्रमोशनचा मार्ग सोपा होईल. छान दिवस.
वृश्चिक ( शुभ रंग- निळा)
योग्य आर्थिक नियोजन करून व केवळ चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य देऊन कार्यक्षेत्रात स्पर्धेला तोंड देता येईल. आज मित्र तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवतील.
धनु (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 29 June 2025
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेली आश्वासने फार मनावर घेण्याची गरज नाही. आज संध्याकाळी तुम्ही सत्संगाची वाट धरणेच हिताचे राहील.
मकर (शुभ रंग- सोनेरी)
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे समाधान होणे कठीण. आज गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. विश्वासातली व्यक्ती ही विश्वासघात करू शकेल. प्रलोभने टाळा.
कुंभ ( शुभ रंग- क्रीम)
आज वैवाहिक जोडीदाराशी तुमचे चांगले सूर जुळतील. धन्यवाद भागीदारां बरोबर एकमत राहील. मोठे व्यावसायिक करार यशस्वी होतील. तुमच्यातील सकारात्मकता वाढेल.
मीन ( शुभ रंग – पिस्ता)
आज जे काही कराल ते तब्येतीला जपूनच करावे. तुमचे काही जुने आजार डोके वर काढणार आहेत. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेतलेला बरा.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424